पोळी दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोळी दान
पोळी दान

पोळी दान

sakal_logo
By

03283
शिवबा प्रतिष्ठानमार्फत ‘पोळी दान’
राशिवडे बुद्रुक : ‘होळी लहान आणि पोळी दान’ संकल्पनेनुसार शिवबा प्रतिष्ठानमार्फत मातोश्री वृद्धाश्रमात पोळ्यांचे वाटप केले. होळीत आहुती पडणारी पोळी गरजूच्या मुखात पडावी, या भावनेने शिवबा प्रतिष्ठानचे मावळे दरवर्षी पोळ्या जमा करून निराधार, निराश्रित लोक असणाऱ्या ठिकाणी वितरित करतात. प्राचार्य ए. एस. भागाजे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे उपक्रम सुरु आहे. यावर्षी मातोश्री वृद्धाश्रमात पोळ्यांचे वाटप केले गेले.
हा उपक्रम बिरदेव गणपती, नवश्या गणपती, राजे गणपती आणि डॅश बॉईजच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यतून जमा झालेल्या पोळ्या रामदास डवरी, अथर्व परीट, प्रथमेश ताळे, रोहन पोवार यांच्यामार्फत मातोश्री वृद्धाश्रमापर्यंत पोचवल्या. यावेळी वृद्धाश्रमाच्यावतीने संस्थापक शिवाजी पाटोळे अॅड. शरद पोटाळे, राजू मालवेकर यांनी शिवबा प्रतिष्ठानचे कौतुक केले.