परिते चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिते चोरी
परिते चोरी

परिते चोरी

sakal_logo
By

परिते येथे कुलूप कापून
सराफी दुकानामध्ये चोरी

राशिवडे बुद्रुक ता. ८ : परिते (ता. करवीर) येथील एका सराफी दुकानामध्ये कुलूप कापून चोरीचा प्रकार झाला. यामध्ये सोन्याचांदीचे सुमारे सव्वा लाख रुपयाचे दागिने लंपास झाल्याचे उघड झाले आहे.

याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी, येथील राशिवडे फाट्यावर भगवान नारायण निंबाळकर (रा. राशिवडे ता. राधानगरी) यांचे लक्ष्मी-नारायण हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. आज सकाळी या दुकानाच्या शटरची दोन्ही कुलपे कापून चोरी झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये ८८ हजार रुपयाची चांदीच्या अंगठ्याचे नग व ३३ हजार रुपयांचे लहान बाळांच्या २४ सोन्याच्या अंगठ्यांचे नग चोरट्याने लंपास केले. याबाबतची फिर्याद श्री. निंबाळकर यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे हे तपास करीत आहेत. या परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात व्यापारी पेठ वाढली आहे. राशिवडे फाट्यावर रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. मात्र ही चोरी मध्यरात्री बारापासून पहाटे पाचपर्यंत झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.