घाटगे कार्यक्रम

घाटगे कार्यक्रम

03286

ई-लर्निंग शिकून शाळेचा
नावलौकिक वाढवावा

सुहासिनीदेवी घाटगे; फेजिवडेत ई-लर्निंग सुविधेचे लोकार्पण

राधानगरी, ता. १३ : विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या ई-लर्निंग सुविधेचा फायदा मुलांनी घेऊन शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
राजे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून ई-लर्निंग सुविधा देण्याच्या उपक्रमांतर्गत फेजिवडे (ता. राधानगरी) येथे प्राथमिक शाळेतील ई-लर्निंग लोकार्पणावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील होते.
घाटगे म्हणाल्या, ‘समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून शाळेस ई लर्निंग सेट प्रदान करीत आहोत. फेजीवडेसारख्या ग्रामीण भागात ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.’ यावेळी नंदकुमार पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच फारूक नावडेकर, उपसरपंच संजीवनी कांबळे, ‘शाहू’चे संचालक सचिन मगदूम, पोलिसपाटील गौतम कांबळे, विलास रणदिवे, तालुका सरचिटणीस संजय पाटील, अंकुश तुरंबेकर, रेश्मा कानकेकर, मीना पाटील, दीपक गुरव, सुरेश कानकेकर, प्रतिभा कासार उपस्थित होते. मुख्याध्यापक दामोदर एरुडकर यांनी स्वागत, दत्तात्रय पोकम यांनी आभार मानले.
...अन् समरजितसिंहराजेंनी शब्द पाळला...
समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी धरणस्थळी राधानगरीकरांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली. त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com