येळवडे यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येळवडे यात्रा
येळवडे यात्रा

येळवडे यात्रा

sakal_logo
By

02232
राशिवडे बुद्रुकला
अंबाबाई पालखी सोहळा
राशिवडे बुद्रुक, ता. २१ : आकाशाला गवसणी घालणाऱ्या सासनकाठ्या.. मिरवणुकीत गुलालाची उधळण आणि बेधुंद तरुणाई अशा जल्लोषी वातावरणात येळवडे ( ता. राधानगरी) येथील अंबाबाईच्या यात्रेचा मुख्य दिवस झाला. सकाळी पहाटे देवीस अभिषेक घातल्यानंतर मानाचे दंडवत आणि मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक पारंपरिक ‘पी ढबाक’च्या तालावर झाली. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं...चा गजर करीत निघालेल्या मिरवणुकीत पारंपरिक बाज दिसून आला. याच सासनकाठ्यांची एकत्रित मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरू झाली. नवी झालर, नवा बाज मिरवणुकीला दिसून आला. तरुणाई बेधुंद होऊन गुलालाची उधळण करीत होती. सायंकाळी सहा वाजता मिरवणूक विसर्जित झाली. प्रचंड गर्दीत पण शांततेत जल्लोष अनेकांनी अनुभवला.
रात्री देवीच्या पालखीची धनगरी ढोल व खेळे मंडळांच्या उपस्थितीत मिरवणूक झाली. यावेळी आकर्षक आतषबाजीसह मांड जागवण्याचा कार्यक्रम झाला. उद्या गुढीपाडव्यादिवशी गोडा नैवेद्य आणि सायंकाळी पाडवा वाचनाने यात्रेची सांगता होईल.