एसटीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीची मागणी
एसटीची मागणी

एसटीची मागणी

sakal_logo
By

राधानगरी-गगनबावडा
एसटी सेवा सुरू करण्याची मागणी
राधानगरी ता. २२ : रस्ता एसटी वाहतूकयोग्य बनल्याने राधानगरी-गगनबावडा एसटी सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी राधानगरी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली.
राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यांना कमी अंतराने जोडणाऱ्या पर्यटन आणि दळणवळण विकासाला सहाय्यभूत प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४७ चे दोन दशकांनंतर दुरवस्था संपली आहे. याबाबत ‘सकाळ’ने रस्ता सुधारणेमुळे दळणवळण सुलभता वाढल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. दीड किलोमीटरच्या भागाची सुधारणा व डांबरीकरण नसल्याने या दोन तालुक्यांदरम्यानची एसटी वाहतूक दीड दशकांपूर्वीच कायमस्वरूपी बंद झाली होती. कमी अंतराच्या रस्त्यावरून होणारी एसटी सेवा बंद झाल्याने आजही दोन तालुक्यांतील लोकांना दुप्पट अंतर पार करून कोल्हापूरमार्गे राधानगरी, गगनबावड्याला ये-जा करावी लागते. सामान्य प्रवाशांच्या पैसा व वेळेचा अपव्ययच सुरूच आहे. रस्ता दुरवस्थेचा अडसर दूर झाल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी सेवा सुरू व्हावी, यातून राधानगरी आगाराच्या उत्पन्नात भर पडेल. तत्काळ निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला.