कृषी महोत्सव

कृषी महोत्सव

02259
कृषी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
दुसरा दिवस; एकरी ६० टन उत्पादन घेणाऱ्यांचा सत्कार

राशिवडे बुद्रुक, ता. २७ : येथे कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली.
आज तालुक्यातील एकरी ६० टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार झाला. यावेळी आनंदा दादु पाटील-अर्जुनवाडा, सदाशिव जंगम-राशिवडे, आनंदा चौगुले-शिरोली, रमाकांत तोडकर-राशिवडे यांना अनुक्रमे २५ हजार रु., १५ हजार, १० हजार व ७ हजार रोख व ट्राॅफी प्रदान केली. दत्तात्रय पाटील- येळवडे, अशोक पाटील- गुडाळ, दत्तात्रय पाटील-गुडाळ, शहाजी पाटील-कासारपुतळे, अवधूत पाटील-पडळी, धनाजी पाटील-तिटवे यांचा प्रोत्साहनपर सत्कार झाला.
कृषि यांत्रिकीकरण घटकांतर्गत रामचंद्र पाटील- पुंगाव, शांताबाई पाटील- येळवडे, कल्पना पाटील, अतुल सुतार, संदीप सरवळकर यांना ट्रॅक्टर वितरित केले. धान्य महोत्सवात आजरा घनसाळ, इंद्रायणी, रत्नागिरी २४ तांदूळ, नाचणी, वरी, सेंद्रिय गूळ यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबीटकर यांनी मार्गदर्शन केले. आत्मा संचालक दशरथ तांभाळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डाॅ अधिकराव जाधव, कृषि पंडित सुरेश देसाई, रेशीम उद्योजक दीपक शेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. अशोक फराकटे, अरुण जाधव, बाळासो बर्गे, संग्राम पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते. कृषी उपसंचालक रवींद्र पाठक यांनी आभार मानले.

चौकट
कृषि प्रदर्शनाचे आकर्षण -
१५ किलो वजनाचा फणस, पाच किलो वजनाचा कोबी, ८ किलो वजनाचा मुळा, साबुदाणा कंद, परदेशी भाजीपाला, जातीवंत जनावरांसह पुंगनूर जातीची केवळ तीन फूट उंचीची गाय, दुर्मीळ होत चाललेल्या माडग्याळ जातीचा मेंढा या गोष्टी प्रदर्शनातील आकर्षण ठरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com