
बुडून मृत्यू
3310
...
येळवडे येथे शाळकरी मुलाचा
भोगावती नदीत बुडून मृत्यू
राशिवडे बुद्रुक, ता. ३१ : येळवडे (ता.राधानगरी) येथे एका शाळकरी मुलाचा भोगावती नदीत पाय घसरून बुडून मृत्यू झाला. श्रीधर संभाजी राबाडे (वय १४) असे त्याचे नाव आहे. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.
याबाबतची अधिक माहीती अशी, श्रीधर हा शाळेतून आल्यानंतर वडील संभाजी यांच्यासोबत शेताकडे गेला होता. शेतीकाम आटोपताच श्रीधर हातपाय धुण्यासाठी नदीपात्रात उतरताना पाय घसरुन पाण्यात पडला. भोगावती नदी तुडूंब असल्याने त्याला अंदाज आला नाही, शिवाय पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर गावातील युवकांनी नदीपात्रामध्ये शोध घेतल्यानंतर तासाभरात त्याचा मृतदेह सापडला. आठवीत शिकणारा श्रीधर हा उदयोन्मुख कबड्डीपटू होता.
घटनास्थळी पोलिस निरिक्षक स्वाती गायकवाड, हेड काँस्टेबल कृष्णात यादव, कृष्णात खामकर, अरविंद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. श्रीधरच्या मागे आई, वडील, आजी व लहान भाऊ असा परिवार आहे.
...