
मार्ग बंद
राधानगरी- दाजीपूर राज्यमार्ग
आजपासून वाहतुकीसाठी बंद
दोन महिन्यांत मोऱ्या, लहान पुलांची होणार पुनर्बांधणी
राधानगरी ता.३ : राधानगरी- दाजीपूर पर्यंतचा राज्यमार्ग आजपासून (ता.४ ) वाहतुकीसाठी बंद होत आहे, अशी माहीती उपअभियंता एस. बी. इंगवले यांनी दिली.
दोन महिने म्हणजे ३१ मे पर्यंत या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. कोल्हापूर, कोकण आणि कर्नाटकातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दोन महिन्याच्या काळात या रस्त्यावरील मोऱ्या, लहान पुलांची पुनर्बांधणी व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. वाहतूक बंद करण्यात आलेल्या रस्त्यादरम्यान वाहन चालकांच्या माहितीसाठी प्रमुख ठिकाणी दिशाचिन्हे आणि माहिती फलक लावण्यात येतील. तर पर्यायी मार्गाच्या प्रारंभाच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून वाहन चालकांना मार्गदर्शनासाठी २४ तास सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत.
अवजड व मोठ्या वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून पूर्ण बंद करण्यात आली आहे. अवजड वाहने फोंडा- कणकवली फाटा -नांदगाव- तळेरे-वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे वळविण्यात आली आहेत. कर्नाटकातून येणाऱ्या अवजड वाहनांना कोकणात जाण्याकरिता मुधाळतिट्टा- आंबोली- सावंतवाडी पर्यायी मार्ग राहणार आहे.
...
*हलक्या व लहान वाहनांकरता पर्यायी मार्ग -*
कोल्हापूरहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठीः बालिंगा- महेपाटी- कोते- धामोड- शिरगाव- कसबा तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपूर.
मुदाळतिट्टाहून कोकणात जाण्यासाठीः सरवडे- सोळांकूर- राधानगरी- (इंडाल फाटा) पिरळ पूल- पडळी- कारीवडे- दाजीपूर.