भोगावती यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगावती यादी
भोगावती यादी

भोगावती यादी

sakal_logo
By

‘भोगावती’साठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध

राशिवडे बुद्रुक, ता. ११ : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. राधानगरी व करवीर या दोन तालुक्यांतील ५८ गावांतील २७ हजार ५५८ सभासद आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत साडेपाच हजार मतदारसंख्या मयत सभासद वगळल्याने कमी झाली आहे. १९ मे पर्यंत हरकती मागवल्या आहेत. महिनाअखेरीस पक्की यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. पावसाळ्याचा विचार करता निवडणुकीबाबत सभासद संभ्रमात आहे.
आगामी निवडणूक गटवार होत असून २५ संचालक निवडायचे आहेत. यावेळी संचालकसंख्या वाढल्याने इच्छूकांना आशा आहे. राधानगरी तालुक्यात १४ हजार २५४ तर करवीरमध्ये १२ हजार ८०९ सभासद आहेत. गटवार सभासद संख्या अशी : कौलव (४३७१), राशिवडे बुद्रुक(५७४२), कसबा तारळे (४१४१), कुरुकली (५०५१), सडोली खालसा (५३१५), हसुर दुमाला (२४४३). कारखान्याचे दोन व्यक्तिगत सभासद असून ४९३ संस्था सभासद आहेत. कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी प्रसिद्ध केलेली यादी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
गेल्या निवडणुकीत ३२ हजार ७०० वर मतदार होते. आजवरच्या निवडणुकीत मयत सभासद कमी न झाल्याने झालेला फुगवठा यावेळी लक्ष देऊन कमी केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारसंघ २७५८ पर्यंत खाली आहे.
साधारणतः मे अखेरपर्यंत पक्की यादी तयार होईल. त्यानंतर लगेचच कार्यक्रम जाहीर झाल्यास पुढे ४५ दिवसाचा अवधी असतो. हा कालखंड पाहिल्यास मतदान प्रक्रिया जुलै च्या मध्यावर जाते आणि हा काळ या परिसरात अतिवृष्टीचा असतो. याचा विचार करता निवडणूक आताच होईल हे ठामपणे सांगता येत नाही.