आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन
आंदोलन

आंदोलन

sakal_logo
By

राधानगरी ग्रामपंचायतीचा
रास्ता रोकोचा इशारा

रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप

राधानगरी : राधानगरीतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप करीत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीने दिलेल्या कालावधीत गटारीचे काम पूर्ण न केल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १८ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सविता भाटळे यांनी निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे, निपाणी- देवगड या बहुराज्य मार्गावरील या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गटर बांधकाम संथ आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे काम बंद आहे. बांधकाम करण्यापूर्वी ठेकेदार कंपनीचे कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व राधानगरी ग्रामपंचायत सरपंच आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये अतिक्रमण हटवणे, वृक्षतोड हद्द निश्चित करणे आदींवर चर्चा करून कोणताही विलंब न करता काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. तसेच गटर बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एक महिना उलटूनही गटरचे काम दहा टक्केही पूर्ण झालेले नाही. ठेकेदार कंपनीला त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन १७ मे पर्यंत द्यावे. अन्यथा १८ मे रोजी राधानगरी येथे रास्ता रोको करु. हे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागासह तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.