भोगावती यादीवर हरकत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगावती यादीवर हरकत
भोगावती यादीवर हरकत

भोगावती यादीवर हरकत

sakal_logo
By

‘भोगावती’ च्या मतदार
यादीवर सर्वपक्षीयांची हरकत

२६८३ मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप

राशिवडे बुद्रुक, ता १९: भोगावती कारखान्याच्या मतदार यादीवर सर्वपक्षीयांनी हरकत घेतली आहे. यादीतील २६८३ मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप करून या मतदारांचा समावेश करून नवी यादी जाहीर करावी, अशी मागणी आज निवेदनाव्दारे साखर सहसंचालकांकडे केली आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने नुकतीच २७ हजार ५५८ सभासदांची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. हरकत घेण्याची आजची अंतिम तारीख होती. प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर आज भाजप, काँग्रेस (सतेज पाटील गट), शेकाप, शिवसेना आदींनी हरकत घेतली असून २६८३ पात्र मतदारांची नावेच यादीतून गहाळ केल्याची तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, हे सर्व सभासद कारखान्याचे कायदेशीर सभासद असून त्यांना वगळण्याची कारणे नाहीत. ते अपात्र किंवा स्वतःहून सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही. ते नियमानुसार निवडणुकीचे मतदार ठरू शकतात. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये २६८३ सभासद हे मतदार आपल्याला मतदान करणार नाहीत या भितीपोटी ही नावे जाणीवपूर्वक गहाळ केली आहेत. तरी यांचा यादीमध्ये समावेश करावा.
शिवसेनेचे अजित पाटील व निवास पाटील यांच्या सहीचे हे निवेदन देताना कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी उपाध्यक्ष के. बी. पाटील, नामदेव पाटील, महादेव कोथळकर, राजाराम कवडे, विश्वास पाटील, एकनाथ पाटील, संजय डकरे, बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते.