पाणी साठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी साठा
पाणी साठा

पाणी साठा

sakal_logo
By

राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांत
गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात घट

राधानगरी : तालुक्यातील तिन्ही धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात घट असली तरी नियोजनानुसार अजूनही महिनाभर पाणी पुरेल इतका जलसाठा आहे, अशी माहिती सूत्राने दिली. सध्या राधानगरी धरणातून ५०० क्यूसेक, तुळशी धरणातून १७५ व काळम्मावाडी धरणातून १२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सातत्याने रोज एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला तरी २५ दिवस पाणी सहज पुरेल इतका साठा आजमितीस शिल्लक आहे. तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्याची स्थिती कंसात गतवर्षीची स्थिती : राधानगरी धरण २८ टक्के (३६ टक्के), काळम्मावाडी ११ टक्के ( ३१ टक्के), तुळशी धरण ३६ टक्के (५२ टक्के). यामध्ये काळम्मावाडी धरणाच्या अस्तरीकरणासाठी तब्बल सहा टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा सोडल्याने या धरणात पाणी पातळी कमालीची खालावलेली आहे. मात्र व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे सद्यस्थितीला पाणीटंचाई भासेल, अशी परिस्थिती नाही.