हरकतीवर सुनावणी झाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकतीवर सुनावणी झाली
हरकतीवर सुनावणी झाली

हरकतीवर सुनावणी झाली

sakal_logo
By

‘भोगावती’च्या मतदार
यादीवरील हरकतींवर सुनावणी


राशिवडे बुद्रुक, ता. २४ : भोगावती कारखान्याच्या निवडणूक प्रारूप मतदारयादीवर घेतलेल्या हरकतींवर आज साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावर दोन दिवसांत निर्णय होईल. यानंतर निवडणूक कार्यक्रमाचे चित्र स्पष्ट होईल.
भोगावती कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणुक विभागाने नुकतीच २७ हजार ५५८ सभासदांची मतदार यादी प्रसिद्ध केली. यामध्ये २६८३ इतके सभासद पात्र मतदार असूनही त्यांची नावे जाणीवपूर्वक यादीतून गहाळ केल्याची तक्रार केली होती. सर्व कायदेशीर सभासद असून अपात्र किंवा स्वतःहून सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही. ते नियमानुसार निवडणुकीचे मतदार ठरू शकतात, अशी मागणी केली होती.
यावर आज निवडणूक अधिकारी श्री. गाडे यांच्यासमोर तक्रारदारांच्यावतीने ॲड. प्रबोध पाटील, ॲड. नेताजी पाटील यांनी सभासद अपात्र करण्याचे अधिकार संचालक मंडळाला नाहीत. त्यांना पात्र ठरवावे, असे म्हणणे मांडले. तर कारखान्याच्यावतीने ॲड. लुईस शहा यांनी संबंधित सभासदांना नोटीसा पाठवूनही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ते अपात्र ठरतात, असे नमूद केले. यावर दोन दिवसांमध्ये निर्णय होणार आहे.