
कोल्हापूर - भुईबावडा घाटात ट्रक पलटी, मार्गावरील वाहतूक ठप्प
गगनबावडा : मैद्याची पोती घेऊन जाणारा ट्रक भुईबावडा घाटात पलटी झाला आहे. हा अपघात दुपारी 12 वा. च्या दरम्यान झाला . टायर फुटून हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या अपघातामुळे या घाटमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. नाइक . आर.व्ही. नारणवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत.
मैद्याने भरलेला ट्रक ( नं.एमएच15-ईजी- 7839) सिन्नरहून गोव्याकडे चालक सचिन दशरथ शिरसाट घेऊन जात होते. त्यांच्यासोबत क्लिनर विकास अशोक रंगचोरे होते. भुईबावाडा घाटात ट्रक आला असता ट्रकचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. आणि ट्रक रस्त्यातच पलटी झाला. या अपघातात मैद्याच्या पिशव्या खोल दरीत गेल्या आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Web Title: Truck Overturned Kolhapur Ghat Bhuibawda Ghat Traffic Jam On Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..