esakal | कोल्हापूर :यादवनगरात दोन गटात हाणामारी; दोन महिलांसह पाच जण गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

fighting in two groups

कोल्हापूर: यादवनगरात दोन गटात हाणामारी; दोन महिलांसह पाच जण गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: यादवनगरात एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. यात दोन्ही गटाकडून तलवार, चाकू, एडका, बांबूचा वापर करण्यात आला. हल्ल्यात दोन महिलांसह पाच जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. जखमींची नावे - प्रथम प्रदीप जानकर, अनिकेत साळुंखे, अमन मुबारक शेख, त्यांची आई व मावशी अशी आहेत.

हेही वाचा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जावळीत बॉम्ब शोधक पथकाची तपासणी

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यादवनगरात शुक्रवारी रात्री दोन गटात एकमेकांच्याकडे बघण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून शस्त्राचा वापर करण्यात आला. यात पाच जण जखमी झाले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी राजारामपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.

हेही वाचा: चिपी विमानतळ उद्घाटनविषयी सुरेश प्रभूंचं मोठ वक्तव्य

प्रथम जानकरने दिलेल्या फिर्यादेनुसार गाडीचा आवाज मोठा केल्याचा रागातून संशयित अमन शेख, सोहिल मोमीन, शकील जमादार, राजेश पवार, मधुकर दिंडे, मंदार दिंडे, राजेश पवार याचा भाऊ, युवराज पाटील याच्यासह दोन अनोळखी या सर्वांनी चाकू एडक्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. तसेच अमन शेखने दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित प्रथम जानकर, गौरव जानकर, अश्विन शेळके, प्रदीप जानकर, राहूल यादव, ओमकार जानकर, परेश कस्तुरे, अनिकेत शेवाळे यानी तलवार, चाकू व बांबूने मारहण केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील संशयित अमन मुबारक शेख (वय २९), सुहेल गणी मोमीन(२४), मधुकर प्रकाश दिंडे (४६), मंदार मधुकर दिंडे (२१), युवराज तुकाराम व्हल्लार पाटील (३७), प्रथम प्रदीप जानकर (१९), गौरव अनिल जानकर (२५, सर्व रा. यादवनगर) या सात जणांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक इश्वर ओमासे यांनी सांगितले.

loading image
go to top