Upsc result Kolhapur : दत्तवाड येथील प्राथमिक शाळेतला अक्षय नेर्ले यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण

अक्षय याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण नेज हायस्कूलमध्ये झाले आहे. कोल्हापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका घेतल्यानंतर त्याने घोडावत इंजिनिअरिंग इन्स्टिट्युटमधून अभियांत्रिकी पदवी घेतली.
UPSC Commission
UPSC Commission sakal media

कुरुंदवाड, ता. २४ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दत्तवाड (ता. शिरोळ) येथील अक्षय अशोक नेर्ले देशात ६३५ व्या रँकने उत्तीर्ण झाला. यूपीएससी परीक्षा पास होणारा तो दत्तवाड पंचक्रोशीतील पहिलाच विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे कोणतेही खासगी क्लास, अकॅडमीत प्रवेश न घेता अक्षयने यशाला गवसणी घातली आहे.

UPSC Commission
Pune : पीकपद्धतीत बदल न केल्यास जमीनींचे वाळवंट होणार - डॉ. राजेंद्र सिंह

अक्षय याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण नेज हायस्कूलमध्ये झाले आहे. कोल्हापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका घेतल्यानंतर त्याने घोडावत इंजिनिअरिंग इन्स्टिट्युटमधून अभियांत्रिकी पदवी घेतली. लहानपणापासूनच त्याला स्पर्धा परिक्षेचे वेध होते.

त्याचे वडील लष्करातून सेवानिवृत्त झाले असून अक्षयला लष्करी सेवेत जायचे होते. त्यासाठी तयारीही केली होती. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोनवेळा अपयश आले तरी खचून न जाता त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरुच ठेवला व तिसऱ्या‍ प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली.

UPSC Commission
Mumbai : कल्याण शहरात रस्त्याच्या मधोमध वाहन पार्कींग; वाहतूक कोंडीवर पोलिस काय करत आहेत?

‘यश काही एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी दीर्घकाळ तयारी करावी लागते. स्वत:च्या क्षमता ओळखून ध्येयनिश्चिती करुन स्पर्धेत उतरल्यास यश हमखास मिळते.

अक्षय नेर्ले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com