लस संपल्याने कोल्हापुरात उद्यापासून लसीकरण बंद

नव्याने डोसचा पुरवठा होताच पुर्ववत लसीकरण सुरु केले जाईल
vaccination in ratnagiri only three centers storage of vaccine finished
vaccination in ratnagiri only three centers storage of vaccine finished

कोल्हापूर : महापालिकेकडील कोविडचे डोस संपल्याने उद्यापासून शहरातील लसीकरण बंद राहणार आहे. नव्याने डोसचा पुरवठा होताच पुर्ववत लसीकरण सुरु केले जाईल, अशी माहिती महापालिकेने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. शहरामध्ये आज अखेर 90829 आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स व नागरीकांचे पहिल्या डोसचे लसीकरण तसेच 10635 दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण केले आहे. 45 वर्षावरील 40 टक्के शहरातील नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे कोविड-19 लसीकरण मोहिम 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण करण्यात आले.

दुस-या टप्प्यामध्ये 60 वर्षावरील सर्व नागरीक तसेच 45 ते 59 वर्षातील व्याधीग्रस्त नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. तर तिस-या टप्प्यामध्ये म्हणजेच 1 एप्रिलपासून शहरामध्ये 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीकरण सुरु केले आहे. महापालिकेस शासनाकडून आज अखेर 88700 इतक्‍या कोविड-19 लसींचा पुरवठा झाला होता. आज अखेर 90,829 इतक्‍या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे तर 10635 लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण पुर्ण झाले आहे.

सद्या कोविड-19 चा उपलब्ध लस साठा पाहता शुक्रवार (16) लस उपलब्ध होईपर्यंत महानगरपालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचे लसीकरण बंद राहणार आहे. शहरामध्ये सीपीआर हॉस्पिटल मध्ये लसीकरण सुरु राहणार आहे. याव्यतिरिक्त मान्यता प्राप्त खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविड-19 लस उपलब्ध असून 250 रुपयांत लसीकरण करुन घेता येईल. यामध्ये कोल्हापूर इंस्टिट्युट ऑफ आर्थोपेडिक व टोमा, ऍपल हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, जोशी हॉस्पिटल व डायलेसिस सेंटर, ओमसाई अँकोलॉजी हॉस्पिटल, सनराईज हॉस्पिटल, सिध्दीविनायक नर्सिंग हॉस्पिटल, ऍस्टर आधार हॉस्पिटल, मेट्रो मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, दत्तसाई हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, गंगाप्रकाश हॉस्पिटल इ. ठिकाणी कोविड-19 लसीकरण सुरु राहणार आहे. सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com