बारा वर्षे अंथरूनावर असलेल्या अशोकला दिली प्रेमाची भेट अन् अशोक आनंदी झाला

valentine day ashok birajdar special story sangli marathi news
valentine day ashok birajdar special story sangli marathi news

नेर्ले (सांगली) : आज व्हॅलेंटाईन डे. कुणी पत्नीला शुभेच्छा दिल्या. तर कोणी प्रियसीला शुभेच्छा दिल्या. तर कोणी आईला शुभेच्छा दिल्या. तर कोणी वडिलांना आणि नात्यातील अनेकांना. एकमेकांच्या नात्यातला गोडवा व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रकट झाला असेल. परंतु नेर्ले ता वाळवा येथे गेली बारा वर्षे अंथरुणावर खिळून असणाऱ्या अशोक विठ्ठल बिराजदार याच्या बाबतीत मात्र आजचा व्हॅलेंटाईन डे आगळावेगळा ठरला. त्याच्या चेहऱ्यावर आज हास्याची लकेर उमटली अन् अशोक आनंदी झाला.

बारा वर्षांपूर्वी पोहायला गेल्यानंतर अशोकच्या पाठीवर  त्याच्याच मित्रांनी उडी मारली आणि त्याच्या कमरेपासूनचा खालचा भाग  निकामी झाला. आयुष्य उध्वस्त झालं.तेव्हापासून गेली बारा वर्षे अशोक अंथरुणावर खिळून आहे. कोरोनाच्या काळात जगावरती संकट धावून आली होती. या काळात अशोक बिराजदारचं कुटुंब पुरतं हतबल झालं होतं. कन्नड कुटूंबातील असणाऱ्या अशोक बिराजदारच्या घरी त्याचे आई-वडील मोलमजुरी करून आपलं कुटुंब सांभाळतात. 

अंथरुणावर खिळून असलेल् याअशोकची पूर्वीची व्हीलचेअर खराब झाली होती. त्यांना घेणं शक्य न्हवतं. मात्र आज इस्लामपूर येथील सामाजिक ट्रस्ट डॉ. शांताबाई व डॉ बा.रा.जोशी ट्रस्टच्या माध्यमातून अशोकला आज व्हील चेअर आणि पाण्याची गादी प्रेमाची भेट म्हणून देण्यात आली. समाजातील अनेक लोकांनी त्याला मदतीचा हात पुढे केला.

गेल्या वर्षभरापासून त्याला घरातून आत बाहेर करण्यासाठी व्हीलचेअर ची गरज होती.यासाठी सामाजिक कार्यकर्ते आधार फाउंडेशन चे प्रा.विजय लोहार व संतोष खरमाटे यांनी संपर्क साधून इस्लामपूर येथील संदीप मराठी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी डॉ.शांताबाई व डॉ बा.रा.जोशी ट्रस्ट चे प्रमुख डॉ.सदानंद जोशी, संदीप राठी,अमित शहा,आणि गणेश पाटील या त्यांच्या टीमने आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने  अशोकच्या घरी येत त्याला गादी आणि व्हील चेअर ही प्रेमाची भेट दिली. त्यामुळे अशोक च्या चेहऱ्यावर आज पुन्हा एकदा हास्य खुलले. आपण समाजाचे पाईक म्हणून आम्ही अशोक ला आज व्हॅलेंटाईन डे निमित्त ही प्रेमाची भेट दिली आहे. अशोक ला जगण्याची प्रेरणा मिळत राहो अशी भावना संदीप राठी यांनी व्यक्त केली.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com