कोल्हापूर : शेवगा झाला स्वस्त ;लांबलचक पडवळांचीही मंडईत मोठी आवक

महाग झालेली शेवग्याची शेंग आता २० रुपयाला दोन, तर लहान शेंग २० रुपयाला चार झाली
vegetables
vegetablessakal

कोल्हापूर : गेल्या वर्षांपासून महाग झालेली शेवग्याची शेंग आता २० रुपयाला दोन, तर लहान शेंग २० रुपयाला चार झाली. शेवग्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली. १७० रुपये किलो शेवग्याचा दर हा गेल्या वर्षांपासून ते मागील आठवड्यापर्यंत स्थिर होता. २० रुपयाला एक या प्रमाणे शेंग विक्री होती. आज मात्र शेवग्याचा दर खाली आला.

लोकांची शेवगा घेण्यासाठी गर्दी दिसत होती. या आठवड्यात लांबलचक असणाऱ्या पडवळांची आवक झाली. एक पडवळ हे आकारमानानुसार १५ ते २० रुपये पावशेरप्रमाणे विक्री सुरू आहे. उसावरील शेंगही मोठ्या प्रमाणात मंडईत दिसत आहे. डिसेंबर ते मार्चपर्यंत ही उसावरील शेंग मंडईत दिसते.

फळांचे दर (प्रतिकिलो)

  • अंजीर - १५०

  • माल्टा संत्री - ५०

  • मोसंबी - १००

  • चिक्कू - २० ते ८०

  • डाळींब - ६० ते १५०

  • डिलिशियस सिमला सफरचंद - १००

  • तुरकी सफरचंद - १६०/१८०

  • इराणी सफरचंद - १५०

  • पपई - ३० ते ५०

  • थायलंड पेरू - १००/१२०

  • देशी पेरू - ८०

  • किवी - १२० रुपयाला तीन बॉक्स

  • राजा अननस - दहा रुपयाला एक

  • काळी द्राक्षे - ५०

  • सोनाका द्राक्षे - ६० ते ८०

तेलांचे दर

प्रकार प्रति किलोचा दर

  • सरकी १४८

  • सनफ्लॉवर १५०/१६०

  • शेंगतेल १७५

सोने-चांदीचा आजचा दर (पुणे बाजारपेठेनुसार)

  • सोने : ५१,४७०.०० (प्रति तोळा)

  • चांदी: ६३,000 (प्रति किलो)

साखर (गुणवत्तेप्रमाणे क्विंटलचा दर) : ३५०० ते ३६००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com