esakal | Kolahpur : जिल्हा बँकेसाठी १६ नोव्हेंबरला मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

kolhpur

जिल्हा बँकेसाठी १६ नोव्हेंबरला मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी १६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा शुक्रवारी (ता. ८) होईल. दरम्यान, या निवडणुकीसाठी प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्य सहकार प्राधिकरणाने आज नियुक्ती केली. प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भातील आदेश काढले. जिल्हा बँकेच्या संचालकांची मुदत मे २०२० मध्येच संपली आहे, पण कोरोनामुळे कोल्हापूरसह राज्यातील १८ जिल्हा बँकांच्या निवडणुकांना स्थगिती होती. गेल्या महिन्यात ही स्थगिती राज्य शासनाने उठवली. तत्पूर्वीच बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर तीन सप्टेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली, त्यावर १३ सप्टेंबर हरकती दाखल झाल्या.

दरम्यान, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, विकास सोसायटी गटात किमान आठ तालुक्यांत विद्ममान संचालकांविरोधात काहींनी आताच रणशिंग फुंकले आहे. इतर गटातील काही जागांवरही विरोधी उमेदवारांकडून तयारी सुरू असल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेला खो बसण्याची शक्यता आहे.

त्यावरील सुनावणी पूर्ण होऊन अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला जाहीर झाली. बँकेच्या सात हजार ६५० संस्था मतदानासाठी पात्र असून, संचालक पदाच्या २१ जागांसाठी निवडणूक आहे.

बँकेच्या निवडणुकीसाठी संभाव्य कार्यक्रम यापूर्वीच तयार होता. तथापि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी कार्यक्रम प्राधिकरणाकडे पाठवला नव्हता. आज प्राधिकरणाने श्री. काकडे यांची नियुक्ती केल्याने निवडणूक कार्यक्रम उद्या (ता. ७) प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. शुक्रवारी त्याला मंजुरी मिळाल्यानंतर सोमवारपासून (ता. ११) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.

दृष्टिक्षेपात बँकेची निवडणूक

  1. संचालक पदाच्या जागा- २१

  2. पात्र सभासद संस्था- ७६५०

  3. अर्ज भरण्याची प्रक्रिया- ११ ते १८ ऑक्टोबर (सुटी वगळून)

  4. अर्जाची छाननी - २० ऑक्टोबर

  5. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - २१ ऑक्टोबर

  6. अर्ज माघारीचा अंतिम दिवस - ६ नोव्हेंबर

  7. मतदान- १६ नोव्हेंबर

  8. मतमोजणी - १७ नोव्हेंबर

शुक्रवारी घोषणा का?

कोल्हापूरसह राज्यातील अन्य तीन बँकांच्या मतदार यादीवर उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवरील एकत्रित सुनावणी शुक्रवारी (ता. ८) होणार आहे. न्यायालयात या याचिकावरील निर्णय काय होणार, यावर निवडणूक तारखा अवलंबून आहेत. त्यादिवशी याचिका फेटाळल्यास निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

loading image
go to top