महिलांकडून ५० किलोवर खतनिर्मिती; प्लास्टिकवरही प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

महिलांकडून ५० किलोवर खतनिर्मिती; प्लास्टिकवरही प्रक्रिया

कोल्हापूर : कचरावेचक महिलांना रोजगार देण्याच्या उद्देशाने निर्माण चौकात ‘अवनि’ व ‘एकटी’ संस्थेने सुरू केलेल्या विकेंद्रित कचरा प्रक्रिया प्रकल्पात दोन प्रभागांतून रोज संकलित होणाऱ्या अर्धा टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यातून जवळपास ५० किलो खत निर्माण होते; तर सुक्या कचऱ्यातून मिळालेले प्लास्टिकही विकण्यास ठेवले आहे.

महापालिकेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे निर्माण चौकातील जागा ‘अवनि’ व ‘एकटी’ संस्थेला दिली. कचरावेचक महिलांसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खतनिर्मिती करणारे मशिन दिले होते. जरगनगर व तपोवन परिसरातून चार टिप्पर ओला, सुका कचरा संकलित करून प्रक्रियेच्या ठिकाणी आणला जातो. रोज ५०० ते ६०० किलो ओला, तर ४०० ते ५०० किलो सुका म्हणजे प्लास्टिकचा कचरा येतो. प्रकल्पावर रोज सहा महिला काम करतात. ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते.

तर पुनर्वापरायोग्य असलेला प्लास्टिक कचरा स्वतंत्र करून त्याचे मशिनद्वारे बारीक तुकडे (श्रेडींग) केले जातात. ओल्या कचऱ्यातून रोज ५० किलोपर्यंत सेंद्रिय खत तयार होते. महिला ते खत किरकोळ विक्रीसाठी ठेवतात. अनेक नागरिक खत खरेदी करतात. प्लास्टिकचे बारीक तुकडेही पोत्यांत भरून ठेवले जातात. अशा प्रकारचे प्लास्टिक सध्या प्रकल्पावर पाच टन आहे; तर प्रक्रिया करायचे असलेले पाच टन प्लास्टिक आहे. प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकचा वापर डांबरी रस्ते करण्यासाठी केला तर गुणवत्ता वाढू शकते. त्याबाबत महापालिकेने निर्णय घेतलेला नाही.

संस्थेला जागा उपलब्ध करून दिल्या, तर शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प राबवून कचऱ्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. दोन हजार महिलांचे संघटन असल्याने संकलनापासून प्रक्रिया करणे शक्य आहे.

- वनिता कांबळे,इन्चार्ज, ‘एकटी’ व ‘अवनि’

Web Title: Women Fertilization Processes Plastics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..