लेखकांचं गाव...राष्‍ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत ७२ जण

राज्य, राष्‍ट्रीय पुरस्कारांनी सन्मानितसह लिहिताहेत ७२ हात
national award
national awardsakal

इस्लामपूर : लिहिणा-याने लिहीत रहावे. कामेरीसारख्या अक्षरांच्या गावाला कधीतरी नक्की यावे. इथे ७२ हात लिहिते आहेत. ग्रामीण कथाकार रंगराव बापू पाटील, कादंबरीकार दि. बा. पाटील, प्रा. अनिल पाटील(Anil Patil) डॉ. प्राचार्य अशोक पाटील, चित्रपट(movie) कथा लेखक विलास रकटे यांच्या साहित्याला राज्य शासनाच्या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

national award
मुलीचे अंघोळीचे व्हिडिओ काढणारा कारागृहात

वाळवा तालुका क्रांतिकारकांचा म्हणून ओळखला जातो. तसा तो साहित्यिकांचाही आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, कवी, गीतकार पी. सावळाराम, लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर अशा मातब्बरांमुळे क्रांतीभूमि पावन झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात रामचंद्र रावजी शिंदे यांचा सन १९२० च्या पाठ्यपुस्तकात ‘बैल झपाटला’ हा धडा होता. त्याच काळात कृष्णाजी रामजी पाटील यांनी शिवजयंती उत्सव का करावा असा पोवाडा लिहिला. तर निरक्षर पण महाराष्ट्रभर प्रसिद्ध शीघ्रकवी नायकु जाधव यांनी अनेक लावण्या, लोकनाट्ये, कवणे केली. कथा, कादंबऱ्या, शैक्षणिक पुस्तके, काव्यसंग्रह ज्यांच्या नावावर आहेत यात राम अण्णा पाटील, भगवंतराव पाटील डॉ. उदय जाधव, महादेव बारपटे, प्रा. नामदेव क्षीरसागर, लतीफ मगदूम, प्रा.भगवान खोत, शाहीर जगन्नाथ नांगरे, कवी रमेश खंडागळे, शाहीर सकटे, ॲड. किरण पाटील, कवी ज्ञानदेव पाटील, अशोक निळकंठ, प्राचार्य डॉ. संपतराव जाधव, रामचंद्र जाधव, चंद्रकांत जाधव, अनिल आढाव, अनिल लोहार, पंडीत लोहार, अभिजीत लोहार, प्रेमचंद कामेरीकर, सदाशिव चिवटे अशा ५० हून अधिक जणांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

national award
प्रशासकाच्या शक्यतेने अस्वस्थता

दहापेक्षा जास्त पुस्तके ज्यांच्या नावावर आहेत असे ग्रामीण कथाकार रंगराव बापू पाटील, दि. बा. पाटील, राम अण्णा पाटील हे आहेत. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द गाजवणारे व लेखणीच्या वरदहस्ताने साहित्यक्षेत्रात नवी छाप टाकणारे चित्रपट कथा लेखक विलास रकटे यांनी तर गावाचे नाव महाराष्ट्रभर नेले. त्यांचा ‘प्रतिकार’ चित्रपट राज्य पुरस्कारांनी सन्मानित झाला. रंगराव बापू पाटील यांच्या लाव्हर, भोवरा, हुरडा या तीन कथासंग्रास, दि. बा. पाटील यांच्या हिरवा चुडा, प्रा. अनिल पाटील यांच्या बैल या कथासंग्रहाला राज्य पुरस्कार मिळाला. डॉ. अशोक पाटील यांच्या शैक्षणिक प्रबंधाला राज्य पुरस्कार मिळाला.

त्याचबरोबर अनेक लिहित्यांचे साहित्य वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी विशेषांक, नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे कामेरी लेखकांचे गाव म्हणूनचओळखले जाते.

national award
मग बाळासाहेबांनी शिवसेना सडवली का?, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

कामेश्‍वरी साहित्‍य मंडळ

चित्रपट पटकथा, कविता, कथा, कादंब-या, शैक्षणिक प्रबंध, संत वाड्.मय, शाहिरी एवढेच नव्हे तर लोकनाट्य तमाशा, गण, गवळण, वग, कवणे अशा दर्जेदार वाड्मयाची निर्मीती करणारे लेखक या गावात निर्माण झाले. आणि त्यातून साकारले कामेश्वरी साहित्य मंडळ.

''वाळवा तालुक्यातील कामेरी हे राष्ट्रीय महामार्गावरील एक गाव. इथे अनेकजण हौशी लेखक आहेत. लिहित्यांचे साहित्य वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी विशेषांक, नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे कामेरी गाव लेखकांचा म्हणूनच ओळखला जातो.''

-दिलीप क्षीरसागर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com