Kolhapur : 'बाळूमामाचा प्रसाद घेऊन येतो म्हणून निघाला अन्..', वाढदिनीच तरुणावर काळाचा घाला

आकाश हा पुणे येथे नोकरीस होता. आठ दिवसांपूर्वीच तो सुटीवर आला होता.
Kolhapur Crime
Kolhapur Crime esakal
Summary

आकाशच्या लग्नासाठी मुली पाहण्याचेही नियोजन सुरू होते. आकाश एकुलता होता.

गडहिंग्लज : सोमवारी रात्री नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यात झाड कोसळून भडगाव (ता गडहिंग्लज) येथील तरुण ठार झाल्याची दुर्घटना घडली. आकाश अण्णाराव धनवडे (वय २६) असे मृताचे नाव असून वाढदिवसादिनीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबतची माहिती अशी, काल सोमवारी रात्री साडे आठपासून वादळी वारा व विजांचा कडकडाट सुरू झाला. वारा इतका प्रचंड वेगाने वाहत होता की,  वाहनधारकांतही भीतीचे वातावरण तयार झाले होते. या दरम्यान गडहिंग्लजमधील काम आटोपून आकाश हा मोटारसायकलने गावाकडे जात होता.

गाव ५०० मीटरवर असतानाच पुलाच्या पलीकडील चिकन सेंटरजवळ येताच आकाशच्या चालत्या मोटारसायकलवरच बाभळीचे झाड कोसळले. ही घटना समजताच शेजारीच असलेले दुकानदार व नागरिक धावून आले. झाडाखाली सापडलेल्या आकाशला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

Kolhapur Crime
Jalna : दोन वर्षांत रोखले तब्बल 'इतके' बालविवाह; पाच महिन्यात 18 अल्पवयीन मुलींना दिलासा

या घटनेची नोंद पोलिसांत (Gadhinglaj Police) रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आकाश हा पुणे येथे नोकरीस होता. आठ दिवसांपूर्वीच तो सुटीवर आला होता. आज त्याचा वाढदिवस असल्याने सायंकाळी घरात केक कापला. त्यानंतर गडहिंग्लजला जाऊन येतो व गावात येऊन रात्री बाळूमामाचा प्रसाद घेऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला.

परंतु, गडहिंग्लजहून परत येतानाच काळाने वेळ साधली अन्‌ झाड त्याच्या अंगावर कोसळले. त्याचे वडील अण्णाराव सैन्य दलातून निवृत्त होऊन रेल्वे पोलिस सेवेत  दाखल झाले होते. या सेवेतूनही १५ दिवसांपूर्वी ते निवृत्त होऊन गावाकडे आले आहेत. आकाशच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

Kolhapur Crime
Road Accident : महाराष्ट्रातील 'या' चार जिल्ह्यांत तब्बल दोन हजारहून अधिक जणांनी गमावला अपघातात जीव!

आनंदात काळाचा घात....

वडील अण्णाराव यांची नोकरी संपल्याने त्यांनी कुटुंबासह गावीच राहण्याचे ठरविले. त्यामुळे जुने घर दुरुस्त करण्याचीही तयारी सुरू केली होती. उद्यापासूनच हे काम सुरू होणार होते. तसेच आकाशच्या लग्नासाठी मुली पाहण्याचेही नियोजन सुरू होते. आकाश एकुलता होता. आकाशचा वाढदिवस आणि लग्नाचा बेत अशा माध्यमातून घरात आनंदाचे वातावरण असतानाच आकाशवर काळाने घाला घातल्याने धनवडे कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे.

Kolhapur Crime
Belgaum : 'हेस्कॉम'चा गलथान कारभार; विद्युतवाहिनीच्या स्पर्शामुळं शाळकरी मुलीचा हाकनाक बळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com