
सोशल मिडियावरून बदनामी करणाऱ्या तरुणास अटक
पेठवडगाव - बनावट फेसबुक अकौन्ट काढुन अश्लिल मेसेज, शिवीगाळ, धमकी, बदनामी करणाऱ्या एका तरुणास पकडण्यात पोलिसांना यश आले. गेली दोन वर्षे वडगाव शहरातील अनेक तरुणांचे फेसबुक अकौन्ट हॅक करुन कुरापती करणाऱ्या या तरुणास पकडल्यामुळे वडगाव परिसरातील अनेक तरुणांनी सुटकेचा श्वास घेतला. आकाश राजेंद्र मिरजकर (वय २२, हनुमान मंदीर पाठिगे, पिसे गल्ली) असे अटक झालेल्या संशयीत तरुणाचे नाव आहे.
गेली दोन वर्षे शहरातील अनेक तरुणांचे फेसबुक बनावट अकौन्ट हॅक करुन शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरु होते.याचपध्दतीने सागर नामदेव शिंदे(रा.पोळ गल्ली)या तरुणाचे बनावट अकौन्ट करण्यात आले होते. या बनावट अकौन्टवरुन अनोळख्या व्यक्तिचे फोटो भावपुर्ण श्रध्दांजली म्हणुन पोस्ट केली.याशिवाय त्याच्या विरोधातील व्यक्तिंना शिवीगाळ करुन दोघांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न केले.याचपध्दतीने अनेक तरुणांचे बनावट अकौन्ट करुन सोशल मिडीयाचा वापर करत होता. यावरुन बदनामी करुन दोन गटात मारा-मारी होईल. यासाठी बनावट अकौन्टचा वापर करीत होता. याबाबत सागर शिंदे यांनी तक्रार दिली होती.
त्यानुसार प्रभारी पोलिस अधिकारी संतोष घोळवे व सध्याचे पोलिस अधिकारी बी. ए. तळेकर यांनी या अनोळखी व्यक्तिचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांनी फेक अकौन्टचा युआरएल मिळवुन आकाश मिरजकर याच्यापर्यत पोचण्यात पोलिसांना यश आले.याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने गुन्हा कबुल केला.हा अतिशय गंभिर प्रकार असुन त्यांचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.या प्रकरणातील संशयीत आकाश मिरजकर हा एका सुतगिरणीत कामास आहे.तो गेली अनेक वर्षे या पध्दतीचे गुन्हे करत असावा.विशेषता महिलांचे फेसबुक अकौन्ट काढून अश्लिल चॅटींगच्या तक्रारी आल्या आहेत.
Web Title: Youth Arrested For Defaming On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..