कोल्हापूर : वाठार-मंगरायाचीवाडी- अंबपवाडी गव्याचा बिनधास्त प्रवास

गव्याच्या वावराने भिती ऐवजी आनंदी वातावरण पहायला मिळाले.
गव्याचा बिनधास्त प्रवास
गव्याचा बिनधास्त प्रवासsakal

घुणकी : आज सकाळच्या प्रहरी हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे दर्शन दिलेल्या गव्याने बिनधास्त दोन वेळा महामार्ग पार करीत अंबप फाटा - मंगरायाचीवाडीहून अंबपवाडीच्या जंगलात प्रयाण केले. गव्याच्या वावराने भिती ऐवजी आनंदी वातावरण पहायला मिळाले.

अंबपवाडी, मनपाडळे परीसरात जंगल आहे. या जंगलातून या गव्याने रात्रभर प्रवास करून तो किणी वाठार परीसरात आला असावा. सकाळी सातच्या दरम्यान पाणंदीच्या मळ्यातून गव्याने वाठार- वारणागर या रस्त्यावरुन तेली मळ्यातून अंबप फाट्याकडे रवाना झाला. याचवेळी युवकांनी त्याचे व्हिडीओ चित्रण केले. पुणे बंगळूर महामार्ग ओलांडून मंगरायाचीवाडीत जाऊन पुन्हा महामार्गाकडे परतला. महामार्गावरुन अंबपवाडीच्या दिशेने गेला. अंबपवाडीतही शेतकऱ्यांना दर्शन देऊन जंगलात परतला.

या प्रवासात गव्याने कोणत्याही ठिकाणी नुकसान अथवा शेतकऱ्यांना त्रास दिल्याची चर्चा नाही.यापूर्वी गव्याने ८ जानेवारी २०२२ मध्ये अंबपवाडी, मनपाडळे परीसरात दर्शन दिले होते.गव्याच्या प्रवासाची माहिती मिळताच करवीरचे वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल साताप्पा जाधव, वनमजूर पुंडलिक खाडे, दिलीप गुळमुदे यांच्यासह रेस्क्यू टीमने गव्याची शोध मोहीम केली फण गव्याचे दर्शन झाले नाही. गवा अंबपवाडीच्या जंगलात गेला असवा असे त्यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले.

शेतकऱ्यांनी शेतात काम करताना सतर्क रहावे. आजचा गवा अंबपवाडीच्या जंगलात गेला असावा तरीही शेतकऱ्यांनी गाफिल राहू नये. त्याला शोधण्याचा प्रयत्न करु नये.

साताप्पा जाधव वनपाल, करवीर वनविभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com