"...तर कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

कोल्हापूर - ""कोल्हापुरी चपलांचे मूळ सौंदर्य व गाभा कायम ठेवून कालानुरूप बदल केल्यास कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करेल. त्यासाठी चप्पल निर्मितीपासून मार्केटिंगपर्यंत विविध बाजू सक्षम करण्यासाठी शासन कारागिरांच्या पाठीशी राहील,'' अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या कारागिरांसाठी झालेल्या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

देसाई म्हणाले, ""राज्यात अनेक गावांत परंपरागत उद्योग व्यवसाय आहेत. असे उद्योग व्यवसाय भविष्यातही सक्षमपणे चालावेत, त्यातून जगण्याला बळ मिळावे यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून जवळपास 120 उद्योग व्यवसायांचा क्‍लस्टर बनविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे काथ्या बनविण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्याच धर्तीवर उस्मानाबाद येथेही खवा उत्पादन शास्त्रीय पद्धतीने व्हावे यासाठी प्रशिक्षणास सुरवात केली आहे. पैठणी शालू तसेच चादर कलाकुसर उद्योग विकसित करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापुरी चप्पल कारागिरांसाठी ही कार्यशाळा घेतली.'' 

ते म्हणाले, ""कोल्हापुरी चप्पल हा परंपरागत व्यवसाय आहे. नव्या काळात अनेक जण चांगल्या चप्पलची मागणी करतात. कोल्हापुरी चपलाच्या बांधणीत ग्राहकांच्या अपेक्षेनुसार बदल करावे लागतील. त्याच्या मार्केटिंगचे कौशल्य कार्यशाळेतून समजून घ्यावे.'' 

मंडळाचे सभापती विशाल चोरडिया म्हणाले, ""राज्यात स्थानिक उत्पादनांनी जागतिक स्तरावर लौकिक मिळविला आहे. यात कोल्हापुरी चपलाचाही समावेश आहे. शेकडो वर्षांपासून हजारो कारागीर या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभव व परंपरेला आधुनिकतेचा मुलामा देण्याची गरज आहे. ''

Web Title: Kolhapuri Sandal in International Market