भारतीय नेमबाजी संघात कोल्हापूरची अनुष्का पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - तेहरान (इराण) येथे होणाऱ्या एशियन एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथील अनुष्का रवींद्र पाटीलची भारतीय संघात निवड झाली. तीन ते नऊ डिसेंबरअखेर ही स्पर्धा होणार असून, अनुष्काचा दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात भारतीय संघात समावेश झाला आहे. वर्षभरातील सहा आंतरराष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये स्थान मिळवत अनुष्काने कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी अनुष्का सर्वात लहान वयाची खेळाडू असून, तिने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीयस्तरावर तीस सुवर्ण, पाच रौप्यपदके, चार ब्रॉंझपदके मिळवली आहेत.

कोल्हापूर - तेहरान (इराण) येथे होणाऱ्या एशियन एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथील अनुष्का रवींद्र पाटीलची भारतीय संघात निवड झाली. तीन ते नऊ डिसेंबरअखेर ही स्पर्धा होणार असून, अनुष्काचा दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात भारतीय संघात समावेश झाला आहे. वर्षभरातील सहा आंतरराष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये स्थान मिळवत अनुष्काने कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी अनुष्का सर्वात लहान वयाची खेळाडू असून, तिने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीयस्तरावर तीस सुवर्ण, पाच रौप्यपदके, चार ब्रॉंझपदके मिळवली आहेत. मूळची सांगली जिल्ह्यातील लाडेगावची अनुष्का येथील दुधाळी शूटिंग रेंजवर प्रशिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ती येथील विमला गोयंका स्कूलमध्ये नववीत शिकत असून, शालेय स्पर्धेत सलग पाच वर्षे योगा चॅम्पियन ठरली आहे. तिला प्राचार्या सायली जोशी, विनोदकुमार लोहिया, सुजाता लोहिया, पी. एस. हेरवाडे, प्रबोधिनीचे प्राचार्य माणिक वाघमारे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Kolhapurs Anushka Patil selected in Indian Shooting Team