कोकण रेल्वेला लवकरच कोल्हापूर जोडणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

कोल्हापूर - कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याची 25 वर्षांची मागणी नजीकच्या काही वर्षात पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता अधिक बळकट झाली आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने हे शक्‍य होणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात प्रकल्पासाठी 250 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मार्केट यार्ड, शिये, भुये, कळे, गगनबावडा असा हा सुमारे 103 किलोमीटरचा रेल्वे मार्ग असणार आहे. प्रकल्पासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडावी अशी मागणी पंचवीस वर्षापासून होत आहे. त्याला मूर्तस्वरूप येण्याची शक्‍यता धुसर बनत चालली असताना केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठी सर्व्हेक्षणाचे कामही पूर्ण होत आले आहे. हा रेल्वेमार्ग माकेट यार्ड, शिये, भुये, कळे, गगनबावडा मार्गे वैभववाडीला जोडला जाण्याची शक्‍यता अधिक आहे. याशिवाय साबळेवाडी, कुडित्रे, कळे, गगनबावडामार्गे वैभववाडी या मार्गाचाही अंदाज घेतला जात आहे. मुंबईच्या एका नामवंत कंपनीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून पश्‍चिम घाटाच्या निसर्गाच्या सानिध्यातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. पश्‍चिम घाट ओलांडून तो कोकणच्या समुद्रकिनारी पोचणार आहे. कोल्हापूर आणि कोकण रेल्वे विभाग एकत्र येणार आहेत. या रेल्वे मार्गामुळे प्रामुख्याने फायदा होणार आहे तो व्यापार उदीमासाठी. त्यानंतर त्याचा फायदा होणार आहे तो पर्यटन उद्योगासाठी. या प्रकल्पामुळे साडेसहाशे किलोमीटर परिघातील सुमारे शंभर गावांचा विकास होणार आहे. 

जयगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग झाल्यास जयगड नजीक असलेल्या दिगी रेल्वे स्थानकामुळे ही रेल्वे थेट जयगड बंदरापर्यंत पोचू शकणार आहे. 

थेट दक्षिण भारताशीही संपर्क 
साडेतीन हजार कोटींच्या खर्चातून रेल्वे ट्रॅक आणि अन्य स्टेशन्स यासाठी खर्च होणार आहे. प्राथमिक खर्चासाठी 250 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केल्याने हा मार्ग होणार हे आता निश्‍चित झाले आहे. मार्गामुळे कोल्हापूरचा थेट दक्षिण भारताशीही संपर्क होणार आहे. प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळून कोल्हापूर वैभववाडी रेल्वे धावण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: Konkan Railway will soon joint Kolhapur