पहिल्या स्मृतिदिनी ‘निर्भया’ला श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कोपर्डी (ता. कर्जत) - अत्याचार करून खून करण्यात आलेल्या निर्भयाला पहिल्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकऱ्यांसह राज्यभरातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. 
स्मृतिदिनानिमित्त वासुदेव महाराज आर्वीकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर निर्भयावर अंत्यसंस्कार झाले तेथे सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्वांनी तिच्या आई-वडिलांचे सांत्वन करताना  अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.दरम्यान, भैयूजी महाराज यांच्या सूर्योदय संस्थेने येथे बांधलेल्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडसह विविध मराठा संघटनांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात आणि परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. 

तत्पूर्वी, कर्जत येथे आज सकाळी भैयूजी महाराजांच्या निषेधाच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: kopardi nagar news nirbhaya first Memorial Day Tribute