पोलिस अधिकाऱ्याने आक्षेप फेटाळले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

उलटतपासणी पूर्ण; नवीन साक्षीदाराच्या तपासणीस परवानगी
नगर - कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात आज आरोपीच्या वकिलांनी घेतलेले आक्षेप तपास अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. एका मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्याची सरतपासणी व उलटतपासणी घेण्यात आली. दरम्यान, आरोपीला अटक करणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलची साक्ष नोंदविण्यासही न्यायालयाने परवानगी दिली.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची नियमित सुनावणी आज विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू झाली. आरोपीजवळ सापडलेल्या दोन मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची सरतपासणी राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी घेतली. त्यानंतर आरोपींतर्फे उलटतपासणी घेतली. दुपारच्या सत्रात सहायक तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची उलटतपासणी झाली. 'साक्षीदारावर गुन्हे दाखल आहेत का? भैलुमेला कशाच्या आधारावर अटक केली? साक्षीदार फिर्यादीचे नातेवाईक आहेत का? घटनेबाबत पोलिस उपअधीक्षकांना माहिती दिली होती का?'' असे विचारत "फिर्याद'मध्ये नाव नसल्याने भैलुमेचा गुन्ह्याशी संबंध नाही, तो त्या गावचा नाही, तो पुण्यात शिक्षण घेतो. त्याला या प्रकरणात राजकीय दबावापोटी अडकवले आहे, असे आक्षेप ऍड. प्रकाश आहेर यांनी घेतले. तपासात नाव निष्पन्न झाल्याने आरोपी भैलुमेला अटक केली, असे सांगून निरीक्षक गवारे यांनी सर्व आक्षेप फेटाळले.

दरम्यान, गेल्या सुनावणीला गैरहजर राहिलेले ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी गवारे यांची उलटतपासणी घेतली. 'पोलिसांनी घटनास्थळाच्या काढलेल्या फोटोतून काहीच स्पष्ट होत नाही. घरझडती घेण्यासाठी कोणी घर दाखविले? ग्रामपंचायतीकडे घराच्या नोंदीबाबत वडील, भाऊ यांच्या नावांच्या काही नोंदी सापडल्या का? अशी विचारणा करीत 'तुम्ही साक्षीदारांचे जबाब बदलले'', असे आक्षेप ऍड. खोपडे यांनी घेतले. निरीक्षक गवारे यांनी तेही फेटाळून लावले.

Web Title: kopardi rape & murder case