"कोपर्डीची केस डायरी न्यायालयात सादर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नगर - कोपर्डी अत्याचार व खुनातील आरोपी संतोष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी शुक्रवारी तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उलटतपासणी घेतली. या सुनावणीतही केस डायरीचा प्रश्‍न पुढे आला. अधिकाऱ्यांनी केस डायरी आणली नव्हती. सुनावणी सुरू असतानाच राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ती मागवून घेतली आणि सीलबंद डायरी न्यायालयापुढे सादर केली. 

कोपर्डी येथील अत्याचार व खुनातील आरोपी भवाळ याचे वकील खोपडे यांनी तपासी अधिकारी गवारे यांची उलटतपासणी घेतली होती. त्या वेळी अपूर्ण राहिलेली उलटतपासणी आज घेण्यात आली. खोपडे यांनी तपासातील अनेक बाबींवर आक्षेप घेतला. घटनेनंतर कुळधरणला पोलिस किती वाजता पोचले, त्याची नोंद केस डायरीला केली का, पीडित मुलीच्या सायकलीला मिरचीची पूड होती कशावरून? आढळून आलेली मिरची सीलबंद केली का, न्यायवैद्यक मंडळ कोणत्या वाहनातून आले होते, त्या वाहनाची नोंद केस डायरीला आहे का? वरिष्ठांनी तुम्ही केलेला तपास पडताळणी केला आहे का, असे प्रश्‍न विचारले. केस डायरीला महत्त्वाच्या बाबीची नोंद करावी लागते, असे खोपडे यांनी स्पष्ट केले. 

तपासी अधिकारी आणि सरकारी पक्षाने स्पष्टीकरण दिले. घटनेनंतर मुलीला रुग्णालयात आणल्यावर तुम्ही तेथे गेलाच नव्हता, असा आक्षेप त्यांनी घेतला. गवारे यांची उर्वरित उलटतपासणी उद्या (शनिवारी) होणार आहे.

Web Title: Kopardi's case