कोयना धरणाचे दरवाजे सहा फुटावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटावरून साडेसहा फूट उचलण्यात आले. सकाळी  सांडव्यावरून 39 हजार 36  क्यूसेक व विजगृहातून दोन हजार 100 cusecs असा एकूण विसर्ग 41 हजार 136  क्यूसेक आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 93.87 टीएमसी आहे.

कोयनानगर (ता. पाटण) - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटावरून साडेसहा फूट उचलण्यात आले. सकाळी  सांडव्यावरून 39 हजार 36  क्यूसेक व विजगृहातून दोन हजार 100 cusecs असा एकूण विसर्ग 41 हजार 136  क्यूसेक आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 93.87 टीएमसी आहे.  
 
कोयनेला  179, नवजाला 182 व महाबळेश्वरला  228 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. पाण्याचा एकूण विसर्ग 19 हजार 580 क्यूसेक आहे.  धरणात 94 हजार क्यूसेक पाण्याची आवक आहे. सकाळी नऊ वाजता विसर्गात वाढ झाली आहे. त्यानंतर पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी जास्त होईल.  त्या बाबत आगाऊ सूचना देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyana Dam Water Rain 6 Door Open on 6 feet