कोयना एक्सप्रेस सांगलीत थांबून प्रवाशांना बसने पोहोचवले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मिरज कोल्हापूर मार्गावर रुकडी येथे रेल्वे पुलाजवळ पुराचे पाणी आल्याने रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे रविवारी रात्री येणारी कोयना एक्सप्रेस सांगली स्टेशनवर थांबवण्यात आली त्यानंतर 2 विशेष एसटी बस मधून प्रवाशांना मिरज आणि कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.

सांगली - मिरज कोल्हापूर मार्गावर रुकडी येथे रेल्वे पुलाजवळ पुराचे पाणी आल्याने रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे रविवारी रात्री येणारी कोयना एक्सप्रेस सांगली स्टेशनवर थांबवण्यात आली त्यानंतर 2 विशेष एसटी बस मधून प्रवाशांना मिरज आणि कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.

कोल्हापूर जवळच्या रुकडी येथील रेल्वे पुलावर पुराचे पाणी आल्याने काल दुपारपासूनच हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर पर्यंत जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या सांगली आणि मिरज थांबवण्यात आल्या कोयना एक्सप्रेस काल रात्री बाराच्या सुमारास सांगलीत पोहोचली सांगली रेल्वे स्टेशन वर थांबवण्यात आले त्यानंतर एसटी महामंडळाच्या दोन विशेष बस मागवून त्यामधून प्रवाशांना कोल्हापूर आणि मिरजकडे पाठवण्यात आले तत्पूर्वी या प्रवाशांसाठी खाद्यपदार्थांची सोय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

सांगली रेल्वे स्टेशनचे मुख्य तिकीट पर्यवेक्षक के. एम. तरटे तसेच मुख्य माल पर्यवेक्षक एम गणी, आरक्षण पर्यवेक्षक संध्या राव आणि रेल्वे पोलीस प्रवीण पाटील व अमर देशमुख यांनी प्रवासाची सर्वस्वय करून त्यांना सुखरूप घरापर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyana Express Sangli Passenger Bus