कऱ्हाड, पाटणमध्ये पूर; एनडीआरएफ मदतीला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. कऱ्हाड, पाटणमध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना कृष्णा, कोयना नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. येथील नागरिकांची सुरक्षितरित्या सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'एनडीआरएफ' ची टीम मागवली आहे.

सातारा - जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. कऱ्हाड, पाटणमध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना कृष्णा, कोयना नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. येथील नागरिकांची सुरक्षितरित्या सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'एनडीआरएफ' ची टीम मागवली आहे. मंगळवारी (ता. 6) दुपारी अडीच वाजेपर्यंत हे टीम कऱ्हाड तालुक्यात तैनात होईल. या टीममध्ये 22 जवान असतील. आता ही टीम पुण्यातून कऱ्हाडकडे येण्यासाठी मार्गस्त झाली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.

कराडमधील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने बाजारपेठ ठप्प आहे. मुख्य दत्त चौकात पुराचे पाणी शिरले आहे. शहरातील दोनशे कुटूबांचे स्थलांतर केले आहे. पंताचा कोट, पायऱ्या खाली, सोमवार पेठ, दत्त चौक, पोपटभाई पेट्रोल पंप चौकात पाणी आल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. कृष्णा नदीवरील नविन पुलही वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाडशी विटा व मसूर भागाचा संपर्क तुटला आहे. शहरातील विविध शाळांमध्ये स्थलांचरीत कुटूबांची सोय करण्यात आली आहे. या टीममुळे कराड शहरासह  तालुक्यातील गावात लाेकांचे स्थलांतर केले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyana River Flood Patan Karad NDRF Help Rain