कोयनेच्या पाण्याने वेढले तांबवे गावाला

विशाल पाटील
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोयना नदीला आलेल्या पुरामुळे कऱ्हाड व पाटण तालुक्यातील गावांची स्थिती अत्यंत भयावह झाली आहे. तांबवे गावाची बेटाप्रमाणेस्थिती झाली आहे. येथील लोकांची जनावरे गावाबाहेरील दक्षिण तांबवे, उत्तर तांबवे तसेच अनेक वस्त्यावर गोठ्यामध्ये बांधलेली आहेत. गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे संबंधित पशुपालकांना गावातून बाहेर जाता येत नाही. गावात असलेली ग्रामपंचायतीची बोट सध्या पुराच्या पाण्यामध्ये बुडालेली आहे.

सातारा - कऱ्हाड तालुक्यातील तांबवे येथे कोयना नदीच्या पुराने गावाला वेढा टाकला आहे. गावातील सुमारे 40 टक्के घरे पाण्याखाली गेली आहेत.

ग्रामस्थांचा इतर गाव, वस्त्याचा संपर्क तुटला आहे. अनेक गावकऱ्यांची पाळीव जनावरे गावाबाहेर आहेत. त्यांना चारा देणे, त्यांचे दूध काढण्यासाठी गावकऱ्यांना गावाबाहेर जावे लागते, यासाठी ग्रामस्थाने तरफ बनवले आहे. त्यातून पशुपालक ये जा करत आहेत.

कोयना नदीला आलेल्या पुरामुळे कऱ्हाड व पाटण तालुक्यातील गावांची स्थिती अत्यंत भयावह झाली आहे. तांबवे गावाची बेटाप्रमाणेस्थिती झाली आहे. येथील लोकांची जनावरे गावाबाहेरील दक्षिण तांबवे, उत्तर तांबवे तसेच अनेक वस्त्यावर गोठ्यामध्ये बांधलेली आहेत. गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे संबंधित पशुपालकांना गावातून बाहेर जाता येत नाही. गावात असलेली ग्रामपंचायतीची बोट सध्या पुराच्या पाण्यामध्ये बुडालेली आहे.

यामुळे ग्रामस्थांना बाहेर पडणे अडचणीचे बनले आहे. त्यावर मात करत येथील ग्रामस्थांनी तरफ बनवले आहे. त्यातून हे पशुपालक जनावरांना चारा घालण्यासाठी, जनावरांचे दूध काढण्यासाठी, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी पुराच्या पाण्यातून ये-जा करत आहेत. ही तर बनवण्यात आल्यामुळे अनेक ग्रामस्थांचे अडचण दूर झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyana River Flood Tambave Village Underwater Rain