‘कोयना’चे दरवाजे बंद, पायथा विसर्ग सुरूच

जालिंदर सत्रे 
शुक्रवार, 27 जुलै 2018

पाटण - गेली एक महिना सुरू असलेल्या पावसामुळे विश्रांती घेतल्याने सलग नऊ दिवस कोयना जलाशयाच्या सांडव्यावरून पाणीसाठा नियंत्रणासाठी करण्यात येणारा विसर्ग बंद केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६.४० टीएमसी पाणीसाठा जास्त असून पूरनियंत्रणासाठी पायथा वीजगृह व सांडव्यावरून १४.१९ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडून दिले आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ८३.९५ टीएमसी असून धरणात जलवर्षात ७५.३० टीएमसी पाण्याची आवक झालेली आहे. 

१०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना जलाशयात एक जून रोजी २९.४० टीएमसी व २५ जुलै रोजी दमदार पावसास सुरवात झाली त्यावेळी धरणात २६.१५ टीएमसी पाणीसाठा होता. २३ दिवसांत पाणीसाठा ७७.९२ टीएमसी झाल्यानंतर धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी १७ जुलै रोजी सकाळी आठ वाजता पायथा वीजगृहातून व दुपारी चार वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उचलून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात केली. त्यात सात दिवसांत दोन वेळा दीड फुटाने व तीन वेळा एक फुटाने वाढ करून सात फुटांपर्यंत नेले होते.

१३ ते १७ जुलै या पाच दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच दिवसांत २३.१४ टीएमसी पाण्याची आवक झाली. १६ व १७ जुलै या दोन दिवसांत ११.६१ टीएमसीची विक्रमी आवक झाली होती. मुसळधार पावसामुळे जलाशयात येणाऱ्या पाण्याची सर्वांत जास्त आवक प्रतिसेकंद ७८ हजार ४८५ क्‍युसेक १६ जुलैला झालेली होती. याच दिवशी २४ तासांत सर्वांत जास्त ६.२९ टीएमसी पाणीसाठा वाढलेला होता. एक जूनपासून धरणात ७५.३० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी १७ जुलैपासून आठ दिवसांत पायथा वीजगृहातून १.५३ टीएमसी व सहा वक्र दरवाजांच्या सांडव्यावरून १२.६६ टीएमसी असा १४.१९ टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आलेला आहे. जल वर्ष एक जून रोजी सुरू झाले.   त्यापासून आजपर्यंत पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी ४.७६ टीएमसी व पूर्वेकडे १.७३ टीएमसी पाण्याचा वापर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सिंचनासाठी करण्यात आलेला आहे. गतवर्षी पाणीसाठा ७७.५५ टीएमसी होता, तो पाणीसाठा नियंत्रणासाठी १४ टीएमसी पाणी सोडूनही ८३.९५ टीएमसी असलेला पाहावयास मिळतो.

पावसाच्या विश्रांतीने पूरपरिस्थितीचा धोका टळला
पाऊस थांबल्यामुळे व पाणीसाठा नियंत्रणात आल्यामुळे मंगळवारी पाच फुटांवर आणलेले दरवाजे बुधवारी सकाळी नऊ वाजता चार फुटांनी कमी करून एक फुटावर व दुपारी १२ वाजता पूर्ण बंद केले आहेत. पायथा वीजगृहातील विसर्ग मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने कोयना नदीकाठाला असणारा पूरपरिस्थितीचा धोका टळला आहे.

Web Title: koyna dam door closed