कोयनेतून पाण्याचा विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : कोयना धरण परिसरात पावासाचा जोर कायम असल्याने यंदा महिन्याच्या फरकाने दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे उघडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली आहे. कोयना जलाशायाचा पाणीसाठा 98.78 टिएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक 21255 क्यूसेक होत आहे. त्यामुळे दुपारी एकनंतर धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

पन्नास दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरण परिचलन सुचीनुसार आज (ता. 13 ऑगस्ट) दुपारी एक नंतर परिस्तिथीनुसार धरणातून एकूण विसर्ग 12000 क्यूसेक करण्यात येईल. वक्र दरवाजे किमान तीन फुटाने उचलण्यात येतील, असे विश्वसनीय सुत्रांनी सांंगितले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात 75 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज अखेर त्या भागात 4081 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. नवजाला चोवीस तासात 75 व आज अखेर 4146 मिलीमीटर तर महाबळेश्वरला चोवीस तासात 58 तर आज अखेर 3613 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाचू आजची पाणी पातळी 2158.06 फूट तर मीटरमध्ये  657.911 इतकी आहे.

Web Title: Koyna dam left the water