कोयना, धोम, कण्हेरसह कोळकेवाडी धरण अभेद्य 

कोयना, धोम, कण्हेरसह कोळकेवाडी धरण अभेद्य 

कोयनानगर -  पश्‍चिम महाराष्ट्रातील कोयना, कण्हेर, धोम व कोकणातील कोळकेवाडी धरणे सुरक्षित व अभेद्य आहेत. धरणाचे उत्कृष्ट व्यवस्थापन होत असल्याने ही धरणे चांगली राहिली आहेत. ही धरणे विकसित करण्यासाठी जागतिक बॅंकेकडून अर्थसाह्य दिले जाणार असल्याची माहिती धरण सुरक्षितता मूल्यमापन समितीचे अध्यक्ष दीपक मोडक यांनी दिली. 

राज्य शासनाने धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्प कार्यक्रमांतर्गत तयार केलेल्या धरण मूल्यमापन समितीने आज कोयना व कोळकेवाडी या धरणांची तपासणी व पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील उपस्थित होते. राज्य शासनाने राज्यातील प्रमुख धरणे सुरक्षित ठेवण्याबरोबर त्यात सुधारणा तसेच काही प्रमाणात ती धरणे विकसित करण्यासाठी जागतिक बॅंकेकडून अर्थसाह्य केले जाणार आहे. त्यात कोणत्या धरणाचा समावेश असावा, यासाठी धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पांतर्गत धरण सुरक्षितता मूल्यमापन समितीची 12 जूनला स्थापना केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोयना, कोळकेवाडी, कण्हेर, धोम या धरणांचा त्यामध्ये समावेश आहे. या समितीच्या पाहणी दौऱ्याची सुरवात कोयना धरणापासून झाली. कोयना प्रकल्पाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक समितीचे अध्यक्ष आहेत. 

या दौऱ्यात श्री. मोडक म्हणाले, ""अनेक धरणांवरील वीजनिर्मितीचे प्रकल्प अथवा पर्यटन प्रकल्पातून या धरणाचा विकास करण्यात येतो. या समितीच्या माध्यमातून प्रत्येक धरणाची तपासणी करून त्यात सुधारणा करण्यासाठी व त्यासाठी जागतिक बॅंकेचे अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी शिफारस करण्याचे काम केले जाईल. ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व धरणांची पाहणी व तपासणी केली जाणार आहे.'' 

कोयना धरणाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले जाते. त्यासाठीच गेल्या वर्षी कोयना धरण व्यवस्थापनाला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला आहे. सात रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला तरी कोयना धरणाला कोणताही धोका पोचणार नाही. 
- दीपक मोडक, अध्यक्ष, राज्य धरण सुरक्षितता मूल्यमापन समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com