‘क्रांती’चा देशात सर्वाधिक साखर उतारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कुंडल - कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना २०१७-१८ या गळीत हंगामात देशात सर्वोच्च साखर उतारा मिळविणारा कारखाना ठरला आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघातर्फे ही निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील ऊस विकास संवर्धनाचा कारखान्यास पुरस्कार मिळाला आहे. ही माहिती अध्यक्ष अरुण लाड यांनी आज पत्रकारांना दिली. येत्या १० सप्टेंबरला नवी दिल्लीत पुरस्कार दिले जातील.

ते म्हणाले,‘‘ यापुर्वीही सन २०१४-१५ व २०१५-१६,२०१६-१७ मध्ये देशपातळीवरील विविध पुरस्काराने कारखान्याचा गौरव झाला आहे.  तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक नियोजन, ऊस विकास व संवर्धन तसेच राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता असे राज्य आणि देश पातळीवरील पुरस्कार कारखान्यास मिळाले आहेत.  कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ५००० मेट्रीक टन इतकी आहे. तसेच सहवीज निर्मीती क्षमता १९.७० मेगा वॅट इतकी आहे. तसेच कारखान्याचा नव्याने ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभा केला आहे.’’

यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उपाध्यक्ष दिलीपराव पाटील, वसंत भाऊ लाड, कुंडलिक एडके, गोविंद डुबल, अशोक पवार, दिलीप लाड, संचालक कुंडलिक थोरात, संदीप पवार, जयप्रकाश साळुंखे, अंकुश यादव, नारायण पाटील, अरुण कदम, जयराम कुंभार, आर.के.सावंत पाटील , सचिव वसंत तात्या लाड, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, सरव्यवस्थापक आप्पासाहेब कोरे, वित्त अधिकारी एस.पी.जाधव,  विश्वास लाड उपस्थित होते.

Web Title: Kranti Sugar Factory Sugar Utara Arun Lad