कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जून 2016

वाई - "चला कृष्णा नदी वाचवू या‘, उपक्रमाअंतर्गत सकाळ माध्यम समूहाने वाई पालिकेच्या सहकार्याने हाती घेतलेल्या शहरातील कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेला आज (रविवार) प्रारंभ झाला.

या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांनी एकत्र येत नदी पात्रात साचलेला कचरा साफ केला. या उपक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीत नदी स्वच्छतेबाबत प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले होते.

या अभियानांतर्गत नावेचीवाडीपासून भद्रेश्वर पुलापर्यंत नदी पात्राची, तसेच नदीकाठावर असलेल्या सात घाटांची स्वच्छता लोकसहभागातून करण्यात आली. नदीपात्रातील जलपर्णी व घाण दूर करून नदी प्रवाही करणे, तसेच परिसर स्वच्छ करणे आदी कामांचा समावेश होता. मोहिमेत विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व संघटना, कृष्णाबाई संस्थान, सार्वजनिक मंडळांचे सुमारे 500 कार्यकर्ते, पालिका पदाधिकारी व कर्मचारी, शिक्षक, शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. आमदार पाटील यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेकांनी मोहिमेसाठी लागणारी यंत्रणा स्वयंस्फूर्तीने उपलब्ध करून दिली.

Web Title: krishna river cleaning mission