वारणेवरील दोन्‍ही पूल पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सांगली - कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी कोयना धरणातून ४२ हजार ३७२ क्‍युसेस तर चांदोली धरणातून १० हजार ६२० क्‍युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीतील पाण्याची पातळी गेल्या २४ तासात वाढली आहे. वारणेतील पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे अनेक भागात पिके तसेच शिगाव, दुधगाव, समडोळीतील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्ण नदीवरील बोरगाव, भिलवडी, नागठाणे, मौजे डिग्रज यासह काही ठिकाणचे बंधारे पाण्याखाली आहेत.

कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहिला आहे. दोन्ही धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयनेतील सांडव्यावरून आणि कालवा व विद्युतगृहातून ४२ हजार ३७२ क्‍युसेसने विसर्ग सुरू झाला आहे. तीच परिस्थिती चांदोली धरणाची आहे. तेथूनही १० हजार ६२० क्‍युसेसने विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळीही वाढू लागली आहे. वारणा नदीवरील काखे-मांगले आणि आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली गेला आहे. गतवर्षाची तुलना करता सर्वच धरणात आजच्या दिवशी गतवर्षीपेक्षा पाणीसाठा टक्केवारी जादा असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. पाण्याचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाईल असे प्रशासनाने कळवले आहे.

औदुंबरला सभामंडपात पाणी
कोयना धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पातळी वाढली आहे. यंदा दुसऱ्यांदा पाणी नदीपात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे अंकलखोप परिसरात शेतकर्याना दुसऱ्यांदा शेतीपंप सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. पाण्याची पातळी वाढल्यामुळे औदुंबर (ता.पलूस ) येथे दत्त मंदिराच्या सभामंडपात कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. भाविक पाण्यातून देव दर्शन घेत आहेत. विस्तीर्ण नदीपात्राचे फोटो, सेल्फीचा मोह अनेकांना आवरता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

अलमट्टीतील विसर्ग वाढविला
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची क्षमता १२३ टीएमसी इतकी आहे. धरणात सद्यस्थितीत ११९.४०३ टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणातील पाण्याची आवक १ लाख २६ हजार ८१४ क्‍युसेस आहे. 

तर जावक १ लाख २८ हजार ७७० क्‍युसेस आहे. गतवर्षी सांगली जिल्हा प्रशासन आणि कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून पाणी विसर्ग करण्याबाबत समन्वय साधला होता. यंदाही तेच चित्र दिसत आहे.

पाणीसाठा (सायंकाळी ५ पर्यंत. टी.एम.सी.मध्‍ये)
कोयना- १०१.५८             धोम- १२. ५७
कण्हेर- ९.६१                  चांदोली- ३३.२०
धोम बलकवडी - ३.८९     अलमट्टी- ११९.४०३

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna River Flood Bridge Under Water