‘नमामि कृष्णे’साठी त्रिसूत्री

Krishna-River-Saving
Krishna-River-Saving

सातारा - जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेने आता अधिक तत्परतेने कामकाज करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कृष्णा नदीकाठी असलेल्या ६८ गावांतील सांडपाणी थेट नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी ‘त्रिसूत्री’ अंमलात आणली जाणार आहे. यामुळे ‘नमामि कृष्णा’ स्वच्छ राहण्यास मदत होईल.

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये कृष्णेचा समावेश असून, जिल्ह्यातील चार तालुक्‍यांतून या नदीचा प्रवास होत आहे. वाई, कऱ्हाड, मलकापूर या शहरांसह ६८ गावे या नदीच्या काठी वसलेली आहेत. या नदीच्या पाण्यावरच प्रामुख्याने जलव्यवस्थापन अवलंबून आहे. मात्र, आता कृष्णेला अस्वच्छता, सांडपाण्याचा विळखा पडला आहे. धोमपासून नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गावातील सांडपाणी, उद्योग- कारखान्यांतील प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत मिसळते. हे असेच सुरू राहिले तर पिण्याचे शुद्ध पाणीही मिळणे अशक्‍य होणार आहे. 

स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) देशात प्रथम स्थानी असलेल्या सातारा जिल्हा परिषदेने आता सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णा नदीकाठच्या गावांचा समावेश केला आहे. कृष्णाकाठी असलेल्या जिल्ह्यातील ६८ गावांमध्ये सांडपाणी नदीमध्ये मिसळू नये, यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी ‘त्रिसूत्री’चा अजेंडा ठेवला असून, त्यामध्ये जीओ पद्धत, टॅंकद्वारे सांडपाणी स्थिरीकरण व दूषित पाणी स्वच्छ करून नदीत सोडणे अथवा पुनर्वापर या पद्धती वापरल्या जाणार आहेत. त्यासाठी नागपूर येथील ‘नेरी’ संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे यांनी दिली.

सरपंच, ग्रामसेवकांची बैठक
कृष्णाकाठच्या गावचे सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत बैठक घेण्याची नियोजन केले असून, पुढील आठवड्यात ही बैठक घेतली जाईल.

कृष्णाकाठची ही गावे
धोम, भोगाव, मेणवली, यशवंतनगर, आसले, ओझर्डे, भुईंज, खडकी, चिंधवली, पाचवड, कळंभे, उडतरे (ता. वाई). मर्ढे, लिंब, गोवे, आरळे, वडूथ, बोरखळ, संगममाहुली, क्षेत्रमाहुली, महागाव, कोपर्डे, वेणेगाव, काशीळ, जैतापूर, गोजेगाव, चिंचणेर वंदन, चिंचणेर निंब, जिहे (ता. सातारा). कठापूर, धामणेर, तारगाव, टकले (ता. कोरेगाव). पेर्ले, कोर्टी, खराडे, कवठे, उंब्रज, शिवडे, हनुमानवाडी, वडोली निळेश्‍वर, कोणेगाव, शिरवडे, बेलवडे हवेली, नडशी, वहागाव, घोणशी, कोपर्डे हवेली, खोडशी, गोटे, सैदापूर, गोवारे, टेंभू, कार्वे, कोरेगाव, गोळेश्‍वर, कापील, कोडोली, दुशेरे, शेरे, आटके, गोंदी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, मालखेड, भुयाचीवाडी, तासवडे, खुबी (ता. कऱ्हाड).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com