सांगलीः खानापुरात अखेर कृष्णामाई दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

खानापूर - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात कृष्णा नदीचे पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून दाखल झाले. सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पाईपलाईनमधून पाणी आल्यावर नागरिकांनी एकच जल्लोष केला.

खानापूर - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात कृष्णा नदीचे पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून दाखल झाले. सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पाईपलाईनमधून पाणी आल्यावर नागरिकांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, खासदार संजय पाटील यांना हजर राहता येत नसल्याने खासदार, आमदार अनिल बाबर व अधिकाऱ्यांचा नियोजित सत्कार व इतर कार्यक्रम काही दिवसांनी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

दोन वर्षांपासून पावसाअभावी खानापूर पूर्व भागाची अवस्था दयनीय होती. सर्व तलाव, विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत आहेत. शेती ओसाड बनली आहे; मात्र एप्रिलमध्ये टेंभूचा पाचवा टप्पा कार्यान्वित होऊन बलवडी, बेनापूर, सुलतानगादे, करंजेला पाणी मिळाल्याने दुष्काळाच्या झळा कमी झाल्या. त्यानंतर खानापूरची पाईपलाईन होऊन तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले. भुड येथील पाचव्या टप्प्यातून शनिवारी रात्री १० वाजता सोडलेले पाणी आज सकाळी येथील भगत मळ्यात दाखल झाले.

पाणीप्रश्‍न मिटणार
या पाण्यामुळे खानापूर-पोसेवाडीच्या हद्दीवर असलेला पाझर तलाव भरणार आहे. त्यामुळे खानापूरचा पाणीप्रश्‍न मिटेल. टॅंकरचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. शेतीच्या पाण्याचाही प्रश्‍न काहीअंशी सुटेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna river water distributed in Khanapur Sangli