कृष्णेतील विसर्गाबाबत कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय

कृष्णेतील विसर्गाबाबत कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय

मांजरी (बेळगाव) : गेल्या चार दिवसांपासून कृष्णा नदीच्या (Krushna River)पाणलोट क्षेत्रासह महाराष्ट्रातील (Maharashtra)विविध जलाशयाच्या प्रदेशात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व महाराष्ट्रातील विविध जलाशयातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज (ता. २३) दिवसभरात सुमारे चार फुटाने वाढ झाली. परिसरातील सर्वच रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, (M J Hiremath)जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी युकेश कुमार, चिक्कोडीचे तहसीलदार प्रवीण जैन व अधिकाऱ्यांनी आज कृष्णा नदी काठावरील  मांजरी, इंगळी, येडूर गावांना भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. krushna-visarga-Coordination-in-Karnataka-Maharashtra-information-Collector-Hiremath-nipani-rain-update-akb84

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्र राज्याने समन्वय साधून विविध जलाशयातील सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली असल्याचे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले. कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ  लागल्याने काठावरील व मळी वस्तीतील जनता आपल्या प्रापंचिक साहित्य व जनावरांसह  सुरक्षितस्थळी स्थलांतर होऊ लागले आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास 2019 सालाच्या महापुराची पुनरावृत्ती होऊ शकते. त्याची धास्ती कृष्णा काठावरील. जनतेला लागून राहिली आहे.

गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन विविध मार्गावर पुराचे पाणी येऊन वाहतूक ठप्प झाली आहे. महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या रायबाग तालुक्यातील कुडची पुलावर पाणी येऊन येथील वाहतूक ठप्प झाली असून मांजरीमार्गे वळवण्यात आली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठावरील जनता व मळी भागातील जनता सुरक्षित स्थळी स्वतःहून स्थलांतरीत होऊ लागली आहे. इंगळी येथील मळीभागात राहणाऱ्या 50 कुटुंबीयांना इंगळी गावठाण व त्याच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या प्रशासनाच्या निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे. चिक्कोडीचे तहसीलदार प्रवीण जैन यांनी कृष्णा नदी काठावरील गावांना  भेटी देऊन जनतेला सुरक्षित स्थळी  स्थलांतर होण्याचे आवाहन केले.

कृष्णेतील विसर्गाबाबत कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय
Chiplun Update: चिपळूणात 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट

आज (ता. २३) दुपारी बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी युकेशकुमार, तहसीलदार प्रवीण जैन व इतर अधिकाऱ्यांनी कृष्णा नदी काठावर असलेल्या मांजरी येथे भेट देऊन पुराच्या पाण्याची माहिती घेतली. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासन संपूर्ण सज्ज झाले असून आवश्यक त्या ठिकाणी जनतेला राहण्यासाठी निवारा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विविध जलाशय व कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यातून  मिसळणाऱ्या पाण्याचे मोजमाप करून आलमट्टी जलाशयातून सुमारे दोन लाख 30 हजार कुसेक्स पाण्याचा विसर्ग ठेवण्यासाठी  पाटबंधारे विभागाला सुचित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी मांजरीचे तलाठी मनोज कांबळे, इंगळीचे तलाठी सचिन जाधव, अंकलीचे तलाठी एस. व्ही. गवी, मांजरी ग्रामपंचायत विकास अधिकारी श्री. पोतदार व मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com