"क्षत्रिय मराठा चेंबर'चा मटन विक्री बंदला विरोध 

"क्षत्रिय मराठा चेंबर'चा मटन विक्री बंदला विरोध 

कोल्हापूर - "कोल्हापूर जिल्ह्यातील मटण व चिकन विक्रीदुकाने 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान बंद करण्याच्या आदेशाला क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व सकल मराठा समाजाचा विरोध आहे,' अशी माहिती दिलीप पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मागणीनुसार हा आदेश काढल्याचा आरोपही त्यांनी केला. 

श्री. पाटील म्हणाले, ""जैन, मारवाडी, गुजराती समाजाच्या पर्यूषण पर्वकाळात ही दुकाने बंद करण्याच्या मागणीला प्रशासनाकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. हा आदेश पूर्णपणे बेकायदेशीर व बहुजन समाजाच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात आहे. जैन, मारवाडी समाजाने त्यांच्या पर्यूषण पर्वकाळात काय करावे, काय खावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोणाच्या धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप करत नाही. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.'' 

ते म्हणाले, "मराठा समाजाला मिळालेल्या न्याय हक्काच्या आरक्षणाला देखील सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या आंदोलना मार्फत विरोध केला आहे. त्यासाठी मोर्चे, ठिय्या, धरणे सुरू आहेत. न्यायालयात देखील विरोध केला आहे. परंतु न्यायालयाने मराठा समाजाच्या बाजूने निकाल दिला आहे. मराठा समाजाला विरोध सुरू असल्याने त्याविरोधात जनआंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल. परप्रांतीय लोकांच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यापासून ते रस्त्यावर उतरण्यापर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. ही भूमिका राज्यातील सर्वच समन्वयकांशी बोलून घेण्यात येईल.' पत्रकार परिषदेस स्वप्निल पार्टे, राजीव पाटील उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com