कुलभूषण जाधवांच्या मित्रांकडून भारतामाता की जयचा नारा

प्रशांत गुजर
बुधवार, 17 जुलै 2019

सायगाव  : कुलभुषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून फाशीची स्थगिती मिळाल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन भारतमाता की जयचा नारा दिला. 
दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून श्री. जाधव यांनी आनेवाडी (ता. जावळी) येथे फार्म हाऊस बांधल्यावर ते त्यांच्या आई- वडिलांसमवेत काही काळासाठी नियमितपणाने वास्तव्यास येत होते. त्यामुळे या परिसराशीही त्यांचे एक भावनिक नाते झाल्याने आनेवाडी येथे ग्रामस्थांकडून फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. 

नौदलाचे सेवानिवृत्त कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती आणि कायदेशीर लढाईसाठी सर्व ती मदत देण्यासंदर्भात आदेश झाल्याच्या वृत्ताने आनेवाडीसह परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्‍त केला. 
पुणे- बंगळूर या राष्ट्रीय महामार्गानजिकच्या आनेवाडी येथील पाटबंधारे वसाहतीशेजारी श्री. जाधव यांनी दहा वर्षांपूर्वी शेती व जमीन घेवून घरही बांधले. त्यामुळे सेवानिवृत्त पोलिस असणारे वडील, आई यांच्यासह श्री. जाधव हे कुटुंबियांसमवेत वर्षातून तीन ते चार वेळा सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी येथे येत असत. येथे आल्यावरही ते स्वस्थ न बसता सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे. भावी पिढी सक्षम व्हावी, या उद्देशाने ते उपक्रमही राबवायचे. त्यामुळे ते अशा सामाजिक कार्याने अल्पवधीतच सर्वपरिचित झाले होते. 
अष्टपैलू व्यक्तिमत्तव सामाजिक कामाची मोठी आवड़,सतत येथील विभागात असणाऱ्या शाळेत जावून मुलांना काही शैक्षणिक वस्तू पुरविणे, त्यांना काय हव काय नको ते पाहून त्यांना मदत करणे यासह त्यांच्यात रमून सेनेतील गोष्टी सांगून देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे धड़े या मुलांना ते देत असत , अशी निष्ठा ठेवून देशाप्रती असणारा आदर आणखी दृढ़ करण्यासारख्या गाेष्टी सांगताना मुलांना देशविषयी आदरयुक्त प्रेम निर्माण व्हावे अशी मोठी इच्छा असणारे जाधव याना शेतीचीही मोठी आवड़ आणि माझ्या देशातील प्रत्येक मुलाने देशसेवा करावी अशी भावना दिसून येत असणारे जाधव प्रत्येक कामात कार्यात हिरहिरिने भाग घेणारे म्हणून परिचित होते, 
कुलभूषण जाधव हे गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत हेरगिरी सारख्या गोष्टि त्याच्याकड़ून नक्कीच होणार नाही. आजचा निकालाने आनंद हाेत आहे असे मत आनेवाडीचे ग्रामस्थ व त्यांचे मित्र सदाशिव टीळेकर यांनी ई- सकाळशी बोलताना मत व्यक्त केले, 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On kulbhushan jadhav verdict friends says bharatmata ki jay