कुंडलच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

कुंडल - कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्यापासून लक्षवेधी लढतीची चर्चा सुरू आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद लाड यांच्यात सरळ लढत होण्याचे स्पष्ट चित्र आहे. 

कुंडल गटातून कॉंग्रेसची उमेदवारी महेंद्र लाड यांना, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शरद लाड यांची निश्‍चित आहे. भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती केल्यामुळे ही लढत अत्यंत रोमांचक व लक्षवेधी ठरणार आहे. 

माजी मंत्री व आमदार पतंगराव कदम यांचे जावई व क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे नातू यांच्यातील लढतीची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. 

कुंडल गटात गेले वर्षभर याची व्यूहरचना दोन्ही गटाकडून सुरू होती. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाले आणि तेव्हापासून लाल दिव्याच्या गाडीची चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी कुंडल गट खुला झाला नि ही चर्चा अधिकच सुरू राहिली. महेंद्र लाड व शरद लाड यांचे वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी धुमधडाक्‍यात व जंगी स्वरूपात साजरे केले. राज्यस्तरावरील अनेक कार्यक्रम व स्पर्धा झाल्या. 

पंचायत समितीतही होणार टशन 
कुंडल पंचायत समिती गणही खुल्या गटासाठी झाल्याने येथेही लढत चुरशीची होणार आहे. कॉंग्रेसकडून सत्यविजय बॅंकेचे संचालक प्रशांत पवार यांची उमेदवारी निश्‍चित आहे. प्रशांत हे सत्यविजय बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अरुण मोहनराव पवार यांची उमेदवारी निश्‍चित आहे. अरुण पवार ते "क्रांती'चे नेते अरुण (अण्णा) लाड यांचे समर्थक आहेत. याचबरोबर येथे डाव्या आघाडीच्या वतीने वैभव पवार निवडणूक रिंगणात आहेत. कुंडल जिल्हा परिषद गटातून डाव्या आघाडीच्या वतीने रामचंद्र लाड हे निवडणूक लढवित आहेत. बांबवडे गणातून कॉंग्रेसकडून प्रतिभा सतीश भंडारे निश्‍चित आहेत. राष्ट्रवादीकडून प्रभावती भंडारे, मंगल भंडारे, वैशाली सोनावळे यांनी अर्ज भरले आहेत.

Web Title: kundal zp election