कुंदन धोत्रेंचा स्वच्छतेचा मोहोळ पॅटर्न

राजकुमार शहा 
रविवार, 9 डिसेंबर 2018

मोहोळ :  राष्ट्रवादीचे कुंदन धोत्रे यांची मोहोळ नगर परिषदेच्या स्विकृत नगरसेवक पदी निवड होताच त्यांनी पहिल्या दिवसापासुन स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. प्रभाग क्रं. 2, 3 व 10 मधील तुंबलेल्या गटारी स्वच्छ करून व परिसरातील कचरा अशी पाच ट्रॅक्टर घाण स्वच्छ करून समाजासमोर वेगळा स्वच्छतेचा मोहोळ पॅटर्न ठेवला आहे.

या पुर्वीचे नगरसेवक मुस्ताक शेख यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्या जागेवर धोत्रे यांची निवड करण्यात आली. फटाक्याची आतष बाजी व गुलालाची उधळण संपवुन तसेच सत्काराला फाटा देत त्यांनी शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले. पंचवीस जणांचे पथक बरोबर घेऊन वरील प्रभागातील कचरा व तुंबलेल्या गटारी स्वच्छ केल्या.

नगर परिषदेकडील डास नाशक पावडर संपल्याने त्यांनी स्व-खर्चाने तीन हजाराची पावडर आणुन ती गटारीच्याकडेने व आवश्यक त्या ठिकाणी टाकली. त्यामुळे नागरिकांना होणारा डासांचा उपद्रव कमी होण्यास मदत झाली आहे. या स्वच्छता उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Web Title: Kundan Dhotre's cleanliness Mohol Pattern