गुटखा विक्रीप्रकरणी दोन जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

कुरळप - राजस्थानमधील दोन जणांना गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना पुणे-बंगळूर महामार्गावर कणेगाव (ता. वाळवा) हद्दीत पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

कुरळप - राजस्थानमधील दोन जणांना गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना पुणे-बंगळूर महामार्गावर कणेगाव (ता. वाळवा) हद्दीत पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

आसुराम तैनाराम मांजू (वय 25) व मोहनलाल रामलाल करवासडा (वय 25, दोघेही रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीचा बेकायदा तंबाखूजन्य गुटखा व सहा लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण अकरा लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना पुढील कारवाईसाठी सांगली अन्नभेसळ पथकाच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: kurlap sangli news two arrested in gutkha sailing case