विट्यात प्रयोगशाळेला कृषी आयुक्तांची मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

सांगली -  विटा येथे पाणी, माती आणि पानदेठ तपासणी प्रयोगशाळेस कृषी आयुक्तांनी मंजूरी दिली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी ही माहिती दिली. 

सांगली -  विटा येथे पाणी, माती आणि पानदेठ तपासणी प्रयोगशाळेस कृषी आयुक्तांनी मंजूरी दिली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी ही माहिती दिली. 

खानापूर, तासगाव, आटपाडी तालुक्‍यातून द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांना प्रयोगशाळा गरजेची आहे. किटकनाशक फवारणी आणि रासायनिक खताचा वापर मर्यादित राखून हे पीक घ्यावे लागते. जमिनीमध्ये कोणत्या रासायनिक घटकाची गरज आहे, कोणते किटकनाशक फवारले पाहिजे, याबाबत लवकर माहिती मिळाली तर फायदा होतो. त्यातून उत्पन वाढणार आहे. त्यासाठी प्रयोगशाळेचा प्रस्ताव होता. त्यास मंजूरी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

कांदा चाळ उभारणेसाठी 14 लाखांचा निधी मंजूर आहे. कृषी विभागाकडून योजना राबविण्यात येणार आहे, असे कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले. फळ विम्यासाठी 15 ऑक्‍टोबरपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले. सदस्य विशाल चौगुले, नितीन नवले, सुनिता पवार, जनाबाई पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: lab sanctioned by agricultural commissioner in Vita